छत्रपती संभाजीनगर

उद्योगांच्या समस्यांवर मसिआचे पालकमंत्र्यांना निवेदन

CD
उद्योगांच्या समस्यांवर मसिआचे पालकमंत्र्यांना निवेदन वीज, कनेक्टिव्हिटी, पाणी आणि ट्रक टर्मिनलसह विविध मागण्या, संयुक्त बैठकीचे आश्वासन छत्रपती संभाजीनगर, ता. ११ ः औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज (मसिआ) तर्फे पालकमंत्री संजय शिरसाट यांना गुरुवारी (ता. दहा) निवेदन दिले. औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर संबंधित विभागांसोबत संयुक्त बैठक घेऊन लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन शिरसाट यांनी दिले. मसिआचे अध्यक्ष गजानन देशमुख यांनी औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा सक्षम करण्यासाठी नवीन सबस्टेशन उभारणे, वाळूज व शेंद्रा औद्योगिक क्षेत्रांची कनेक्टिव्हिटी सुधारणे, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी रस्ते उपलब्ध करणे, वाळूजलगतच्या गट क्रमांकांतील उद्योगांना पिण्याचे पाणी देणे तसेच शेंद्रा, वाळूज व चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रांसाठी तातडीने ट्रक टर्मिनल उभारण्याच्या मागण्या मांडल्या. औद्योगिक विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरूच राहील, असे देशमुख यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या शुभेच्छा संदेशाचा समावेश असलेल्या उद्योग संवाद या मसिआच्या त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. बैठकीस माजी अध्यक्ष अर्जुन गायकवाड, उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, सचिव राजेश मानधनी व विरेन पाटील, सहसचिव मिलिंद कुलकर्णी, कोषाध्यक्ष आनंद पाटील, सह प्रसिद्धिप्रमुख सचिन देशमुख, राजेश विधाते, कार्यकारिणी सदस्य रमाकांत पुलकुंडवार, तुकाराम पोतले उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Crisis : भारतात पुन्हा एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवणार? इराण-अमेरिका युद्धामुळे वाढली चिंता, घरगुती गॅस महागणार?

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

Latest Marathi News Live Update : उद्याच्या बैठकीसाठी आंतरवालीत या, मनोज जरागेंचं आंदोलकांना आवाहन

Success Story: 13 लाखांची ExxonMobilची कॉर्पोरेट नोकरी सोडून बनली आर्मी ऑफिसर! कोण आहेत NIT इंजिनीअर अथिरा सुरेश?

SCROLL FOR NEXT