छत्रपती संभाजीनगर

जालन्यात शुक्रवारपासून राज्यस्तरीय ‘कला प्रदर्शन’ चे आयोजन

CD
शुक्रवारपासून राज्यस्तरीय कला प्रदर्शन जालना, ता. ९ : चित्रकलेच्या विविध कलाविष्कारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘मान्सून शो २०२६’ या ३३ व्या राज्यस्तरीय कला प्रदर्शनाचे शहरात आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर, जिल्हा केंद्र, अजिंठा चित्रकला महाविद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन ११ ते १३ सप्टेंबर या कालावधीत अंकुशराव टोपे महाविद्यालयात होणार आहे. प्रदर्शनाचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता.११) सकाळी साडेदहाला कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण सेंटर, जालना जिल्हा केंद्राचे अध्यक्ष राजेश टोपे राहणार आहेत. राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे तसेच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या राज्यस्तरीय कला प्रदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रातून १२० पेक्षा जास्त कलाकारांनी आपल्या कलेचे प्रदर्शनासाठी नाव नोंदणी केली आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध भागांतील कलाकारांच्या कलाकृती पाहण्याची संधी जालनेकरांना मिळणार आहे. कलाकारांसोबतच शालेय विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या प्रदर्शनात सहभाग नोंदवता येणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून ६० पेक्षा जास्त शाळांनी सहभाग नोंदवला आहे. दरम्यान, सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. कला, चित्रकला आणि सर्जनशीलतेची आवड असणाऱ्या रसिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन राज्यभरातील कलाकारांच्या कलाविष्काराचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रा. रावसाहेब ढवळे, प्रा. सुजाता देवरे, प्रा. रविकिरण भुतेकर, प्रा. सोलाट यांच्यासह आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT