विद्यार्थी संसदेच्या निवडणुका मतपत्रिकेवरच घ्या
---
राज्यस्तरीय समिती सदस्यांच्या उपस्थितीत बैठकीतील सूर
---
छत्रपती संभाजीनगर, ता. १७ ः राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयातील विद्यार्थी संसदेच्या निवडणुकांसंदर्भात विविध घटकांचे मत जाणून घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आलेल्या समिती सदस्यांनी महात्मा फुले सभागृह समितीचे शुक्रवारी (ता. १६) संवाद साधून मते जाणून घेतली. या बैठकीत विद्यापीठ व महाविद्यालयीन निवडणुका लोकशाही पद्धतीने मतपत्रिकेवर व तातडीने घ्याव्यात, असा सूर विविध विद्यार्थी, प्राध्यापक प्रतिनिधींनी मांडला.
बैठकीस राज्य समितीचे सदस्य डॉ. प्रशांत अमृतकर, डॉ. धोंडीराम पवार, कुलसचिव डॉ. संजय कवडे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास अंभुरे, संवादक डॉ. संजय शिंदे आदी मंचावर उपस्थित होते. समितीच्या सदस्यांनी विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका घेण्यासंदर्भात विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, प्राचार्य, विभागप्रमुख पदवीधर अधिसभा व पदवीधर व्यवस्थापन परिषद सदस्य आदी घटकांशी सल्ला मसलत, चर्चा करून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि २६ ऑक्टोबर २०१८ च्या एकरूप परिनियमानुसार विद्यार्थी परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने शासनास अहवाल सादर करणार आहेत, असे करिता डॉ. प्रशांत अमृतकर म्हणाले. नांदेड, जळगाव व छत्रपती संभाजीनगर या तीन समितीचे सदस्य राज्यातील सर्व विद्यापीठांना भेटी देऊन संवाद साधणार आहोत, असे डॉ. धोंडीराम पवार म्हणाले. विद्यार्थी संसद निवडणुकांसाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभा करण्याची गरज असून, महाविद्यालयीन निवडणुकांनाही याचा लाभ होईल, असे डॉ. कैलास अंभुरे म्हणाले.
या संवादात प्राचार्य डॉ. अपर्णा कोत्तापल्ले, डॉ. नवनाथ आघाव, डॉ. विवेक मिरगणे, डॉ.बी.टी. पवार, अधिसभा सदस्य डॉ. उमाकांत राठोड, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. योगिता पाटील, बामुटाचे अध्यक्ष डॉ.बी.एल. चव्हाण, डॉ. शेखर शिरसाठ, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी डॉ. लोकेश कांबळे, दीक्षा पवार, अरुण मते, गुणरत्न सोनवणे, आशुतोष ठोंबरे, बाबा चोपडे, स्नेहल दौड, जयश्री कांबळे, मनीषा बल्लाळ, सुकन्या बावस्कर, गणेश तेलवाडे, गणेश लोकरे, अक्रम खान यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. सूत्रसंचालन डॉ. संजय शिंदे यांनी केले. डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.