छत्रपती संभाजीनगर

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील संघाला बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत सांघिक उपविजेते पद

CD
लातूर : महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील मुलांच्या संघाचा सत्कार करताना डॉ. महेश बेंबडे, डॉ. नल्ला भास्कर रेड्डी, डॉ. विक्रम चिंते आदी. -- महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाला बॅडमिंटन स्पर्धेत सांघिक उपविजेते पद -- लातूर, ता. ६ ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व दयानंद वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दयानंद बॅडमिंटन हॉलमध्ये बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील मुलांच्या संघाने सांघिक उपविजेते पद पटकावले. यामध्ये एम.ए. प्रथम वर्षातील प्रशांत अहिरेकर यांनी संघाचे नेतृत्व केले. तर, बीएसडब्ल्यू प्रथम वर्षातील आशिष इंगोले, बीए तृतीय वर्षातील निखिल काळे, विजय गवालवाड आणि सूर्या गजिले या खेळाडूंचा समावेश होता. या विजेत्या स्पर्धकांचा सत्कार सिनेट सदस्य डॉ. महेश बेंबडे, अ विभागीय बॅडमिंटन स्पर्धेचे चेअरमन डॉ. नल्ला भास्कर रेड्डी आणि डॉ. विक्रम चिंते यांच्या हस्ते करण्यात आला. या संघाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, मुख्य समन्वयक तथा क्रीडा संचालक डॉ. भास्कर रेड्डी, प्रा. आशिष क्षीरसागर, प्रा. विष्णू तातपुरे आणि क्रीडा विभाग समितीतील सर्व सदस्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, सचिव माधवराव पाटील टाकळीकर, सर्व संस्था पदाधिकारी, उपप्राचार्य प्रा. नितीन वाणी, पर्यवेक्षक डॉ. गुणवंत बिरादार, क्रीडा विभाग समितीतील सर्व सदस्य, समन्वयक, विभाग प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oil India Gas Discovery: कृष्णा-गोदावरी खोऱ्यात ऑइल इंडियाला सापडला नैसर्गिक वायूचा नवा साठा

Motion Sickness: प्रवास करताना मोबाईल किंवा पुस्तक पाहिल्यावर चक्कर येते? डोकेदुखी, मळमळ का होते? पाहा कारणे...

Marathi News Live Updates: नवी मुंबईतील दोन शाळांना बॉम्बची धमकी; विद्यार्थ्यांना घरी पाठवलं

‘ती केवळ आई नाही, आमची आदिशक्ती’; आईबद्दल बोलताना प्राजक्ता माळी म्हणाली, ‘नृत्य शिकण्यासाठी घरातून विरोध, पण…’

Stock Market Crash: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1200 अंकांनी खाली; गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी स्वाहा; कारणं काय? पुन्हा तेजी येणार?

SCROLL FOR NEXT