छत्रपती संभाजीनगर

महात्मा फुलेंच्या विचारांचा मिरवणुकीतून जागर

CD
((चार सेकंड लीड)) ......... महात्मा फुलेंच्या विचारांचा मिरवणुकीतून जागर ...................... कळंब, ता. १ : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर मिरवणुकीतून करण्यात आला. मिरवणुकीत दहा महाविद्यालयांचे संघ पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव जिल्हा युवक महोत्सवाचे थाटात उद्‍घाटन करण्यात आले. यापूर्वी सकाळी निघालेल्या मिरवणुकीत जिल्हाभरातून आलेल्या दहा महाविद्यालयांच्या संघातील युवा कलावंतांनी सहभाग नोंदविला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाूसन मंगळवारी सकाळी निघालेल्या मिरवणुकीस तहसीलदार हेमंत ढोकले यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे, प्राचार्य डॉ. हेमंत भगवान, जिल्हा समन्वयक प्राचार्य डॉ. संदीप देशमुख, सांस्कृतिक समन्वयक डॉ. दत्ता साकोळे, डॉ. संजय शिंदे आदींसह संयोजन समिती सदस्य उपस्थित होते. संयोजन समिती सदस्य डॉ. दिलीप महालिंगे, डॉ. किशोर शिरसाट, डॉ. शशिकांत पाटील, उपप्राचार्य डॉ. के. डी. जाधव, डॉ. श्रीकांत भोसले, डॉ. नामानंद साठे यांच्यासह प्राध्यापक विद्यार्थी सहभागी झाले. या यात्रेत ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, शंकरराव पाटील महाविद्यालय भूम, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर, साई कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स रांजणी, माधवराव पाटील महाविद्यालय मुरूम, गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय परांडा, शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय व भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, लोहारा या दहा महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले. मिरवणुकीसाठी महात्मा फुले, भारतीय ज्ञान परंपरा व वंदे मातरम् सार्थ शताब्दी ही थीम होती. गिरिधर पांडे, दत्ता जाधव व दिलीप शिराळे यांनी परीक्षण केले. नितीन कडू पाटील यांनी स्पर्धेचे संयोजन केले. ........................... फोटो कळंब : तहसीलदार हेमंत ढोकले यांनी मिरवणुकीला हिरवा झेंडा दाखवला. (दुसऱ्या छायाचित्रात) क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : केंद्रिय मंत्रीमंडळात फेरबदल? महाराष्ट्रातील 'या' नेत्यांचा पत्ता कट होणार?, संभाव्य नावे समोर

India T20I Squad: संजू सॅमसनचं कमबॅक! अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर;बुमराह खेळणार की नाही?

Kalamb News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपळगाव डोळा येथे रास्ता रोको; तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

Shirur News : पूजा गई यांचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी; पती राहुल देवीदास गई यांची मागणी

Marathi News Live Updates : सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल, मनोज जरांगेंची घेणार भेट

SCROLL FOR NEXT