(((लोगो ः साहित्य, संस्कृती, कला, नाट्य)))
---
ABD26J80643
(((फोटो ओळ))) गुलमंडी : तापडिया नाट्यमंदिरात महावितरणच्या प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेचे प्रथम पारितोषिक स्वीकारताना जळगाव परिमंडलाचा संघ.
---
महावितरणच्या रंगमंचावर ‘वारी’ची बाजी
---
छत्रपती संभाजीनगरच्या ‘राजाभियोग’ला द्वितीय; वैयक्तिक पारितोषिकांचेही वितरण
---
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. ३ : महावितरणच्या प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलाचे ‘वारी’ हे नाटक सर्वोत्कृष्ट ठरले. छत्रपती संभाजीनगर परिमंडलाच्या ‘राजाभियोग’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या नाट्य स्पर्धेचा समारोप शुक्रवारी (ता. दोन) तापडिया नाट्यमंदिरात झाला.
महावितरणच्या प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर परिमंडलाने पेशवाईतील सत्तासंघर्ष आणि न्यायदानाचे चित्रण करणारे ‘राजाभियोग’ हे नाटक सादर केले; तर लातूर परिमंडलाने मानवी मूल्ये, सामाजिक विसंगती आणि आजच्या काळातील वैचारिक गोंधळ यावर खोचक भाष्य करणारे ‘रंगलेल्या गालाचा’ हे नाटक सादर केले. नाट्य स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून जळगाव परिमंडलाच्या ‘वारी’ या नाटकाला परीक्षकांनी कौल दिला, तर छत्रपती संभाजीनगर परिमंडलाच्या ‘राजाभियोग’ या नाट्यकृतीला द्वितीय क्रमांक मिळाला.
लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता मनीष ठाकरे, सांघिक कार्यालयाचे महाव्यवस्थापक (मा.सं.) राजेंद्र पांडे, अधीक्षक अभियंता जीवन चव्हाण, परीक्षक डॉ. दिलीप घारे, पद्मनाभ पाठक, योगिता महाजन, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्हे आणि प्रशस्तिपत्रे देऊन गौरविण्यात आले. डॉ. शिवाजी तिकांडे यांनी परिचय करून दिला. अविनाश सानप यांनी सूत्रसंचालन केले.
--
वैयक्तिक पारितोषिक वितरण
- दिग्दर्शन : प्रथम - सागर सदावर्ते (जळगाव), द्वितीय - रमेश शिंदे (छत्रपती संभाजीनगर).
- अभिनय (पुरुष) : प्रथम - रमेश शिंदे (छत्रपती संभाजीनगर), द्वितीय - राहुल निकम (जळगाव).
- अभिनय (स्त्री) : प्रथम - अश्विनी पोतलवाड (छत्रपती संभाजीनगर), द्वितीय - वसुधा सोळुंके (लातूर).
- नेपथ्य : प्रथम - कमलेश भोळे (जळगाव), द्वितीय - अतुल फावडे, प्रवीण मोरे (लातूर).
- प्रकाशयोजना : प्रथम - रवींद्र चौधरी (जळगाव), द्वितीय - अश्विनी देशमुख (नांदेड).
- संगीत : प्रथम - आशिष कासार (जळगाव), द्वितीय - अनिल राजपूत (छत्रपती संभाजीनगर).
- रंगभूषा आणि वेशभूषा : प्रथम - दीपक कोळी (जळगाव), द्वितीय - प्रज्ञा दिवेकर, रत्ना निसर्गे (छत्रपती संभाजीनगर).
- कर्मचारी लेखक : प्रमोद देशमुख (नांदेड).
- उत्तेजनार्थ (अभिनय) : प्रशांत जानराव (लातूर), निवृत्ती जाधव (नांदेड), पल्लवी गायकवाड (छत्रपती संभाजीनगर), दीपाली नरवाडे (जळगाव).
- बालकलाकार : समर्थ जाधव, दुर्वा वंजारी, गोरक्ष कोळी, गीतार्थ भोळे (जळगाव).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.