पान तीन मेन
-
फोटो ओळी, (MAJ26A06024) माजलगाव ः माजलगाव धरणाचा फोटो (छायाचित्र - दिगंबर सपकाळ)
----
धरणाची उंची वाढणार; पुनर्वसितांची धाकधूक वाढली!
२२ गावांचे शेतकरी जमिनी जाण्याच्या भीतीने आक्रमक; अतिरिक्त भूसंपादन होणार नसल्याचा प्रशासनाचा दावा
----------
कमलेश जाब्रस
माजलगाव, ता. ११ ः धरणासाठी एकदा विस्थापित झालो, आता पुन्हा जमिनी गमावण्याची वेळ येणार का, असा सवाल माजलगाव धरणाच्या उंचीवाढीने २२ पुनर्वसित गावांतील शेतकरी उपस्थित करीत आहेत. उंची वाढल्याने ३८ दलघमी अतिरिक्त पाणीसाठा होऊन सिंचनाचा विस्तार होणार असला, तरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आपल्या जमिनी पाण्याखाली जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. अतिरिक्त भूसंपादनाची गरज नसल्याचे प्रशासन सांगत असले, तरी त्याबाबत लेखी आणि ठोस माहिती मिळत नसल्याने ‘उंची वाढणार; पण आमच्या जमिनींचं काय?’ हा प्रश्न पुनर्वसितांच्या पुढे कायम आहे.
माजलगाव धरणाची निर्मिती १९८६ ला होऊन सुमारे चार दशके उलटली. धरणामुळे विस्थापित झालेल्या २२ गावांतील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला, तरी आजही अनेक मूलभूत प्रश्न कायम असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. धरणाची उंची वाढल्यास माजलगावसह परिसरातील सिंचन क्षेत्र वाढून शेतीला फायदा होऊ शकतो. पाण्याची उपलब्धता वाढल्याने खरिपाबरोबरच रब्बी हंगामालाही त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. पण, या विकासाचा मोबदला म्हणून पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असतील, तर त्याला विरोध राहणार असल्याची भूमिका पुनर्वसित गावांतील शेतकऱ्यांनी घेतली आहे. उंचीवाढीच्या निर्णयापूर्वीच पुनर्वसित २२ गावांतील अनेक समस्या सोडविणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जुन्या पुनर्वसनातील प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष करून नव्या प्रकल्पाला प्राधान्य दिल्यास शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
---
कोट
उंचीवाढीच्या निर्णयावेळी पुनर्वसित गावातील शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. जमिनी जात नाहीत ही दिशाभूल करून योजना राबविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. उंची वाढविल्यास सिंचन क्षेत्रात वाढ होणार; परंतु आमच्या जमिनी धरण शंभर टक्के भरल्यास पाण्यात जाऊन नुकसान होणार आहे. यापेक्षा गाळ काढल्यास पाणी साठवण क्षमता वाढेल आणि काढलेला गाळ नापीक जमिनी सुपीक करण्यास मदत होणार.
- नितीन नाईकनवरे, पुनर्वसित शेतकरी.
---
माजलगाव धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय घेण्यापूर्वी धरणासाठी यापूर्वीच आपल्या जमिनी, घरे, आणि गावांचा त्याग करून पुनर्वसनाचा त्रास सहन करणाऱ्या बावीस पुनर्वसित गावांतील शेतऱ्यांवर पुन्हा विस्थापन लादणे अन्यायकारक असून संबंधित शेतकरी व नागरिकांच्या भवितव्याचा शासनाने विचार करावा व निर्णय रद्द होईपर्यंत लढा सुरू ठेवणार आहे.
- मोहन जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजलगाव
---
माजलगाव धरणाची उंची वाढविल्यामुळे अतिरिक्त भूसंपादन करण्याची आवश्यकता नसून माजलगाव धरणाच्या निर्मितीवेळी केलेल्या संपादित जमिनीमध्येच अतिरिक्त पाणी साठवले जाणार आहे. शासनाच्या सर्व परवानग्या व मान्यता मिळाल्यानंतरच अर्धा मीटरने धरणाच्या गेटची उंची वाढविण्यात येणार आहे. यामुळे ३८ दशलक्ष घनमीटर ज्यादा पाणी साठवले जाणार असल्याने शेतकऱ्यांना याचा शेतीसाठी थेट लाभ होणार आहे.
- एस.एम. शेख, कार्यकारी अभियंता, माजलगाव कालवा
---
चौकट ः 1
माजलगाव प्रकल्प दृष्टिक्षेपात
पाणलोट क्षेत्र - तीन हजार 840 वर्डा कि. मी.
एकूण जलसाठा - चारशे 54 दलघमी
लागवडी योग्य लाभक्षेत्र - एक लाख 19 हजार 400 हेक्टर
सिंचन लाभक्षेत्र - 93 हजार 885 हेक्टर
धरणाची लांबी - सात हजार 488 मीटर
नदीपात्रात धरणाची उंची - 31 मीटर
बुडीत गावे व क्षेत्र - वीस हजार 788 हेक्टर
कालव्याची लांबी - 165 कि. मी.
पूर्ण संचय पातळी - 439.8 मीटर
धरण माथा - 435.60 मीटर
धरणाची लांबी - सहा हजार 300 मीटर
---
चौकट 2
लाभ मिळणारे जिल्हे व क्षेत्र
बीड - 28 हजार 300 हेक्टर
परभणी - 58 हजार 385 हेक्टर
नांदेड - 7 हजार 200 हेक्टर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.