छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : अल्पवयीन मेव्हुणीवर बलात्कार, भावजीला मरेपर्यंत जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शिक्षणासाठी भावजीच्‍या घरी आलेल्या तेरा वर्षीय मेव्हुणीला बहिणीला ठार मारण्‍याची धमकी देत तिच्‍यावर वारंवार बलात्‍कार करणाऱ्या भावजीला मरेपर्यंत जन्‍मठेप आणि विविध कलामांखाली सहा हजारांच्‍या दंडाची शिक्षा जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश डॉ. एम. एस. देशपांडे यांनी गुरुवारी (ता. तीन) ठोठावली. विशेष म्हणजे, गुन्‍हा दाखल झाल्यापासून नराधम भावजी फरार झाला होता. चार वर्षांनंतर तो पोलिसांना शरण आला. तेव्‍हा पासून शिक्षा होईपर्यंत तो कारागृहात आहे. या प्रकरणात १३ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली. त्‍यानूसार, पीडिता ही शिक्षण घेण्‍यासाठी गावावरुन बहिण व भाऊजीच्‍या घरी राहण्‍यासाठी आली होती. पीडितेची बहिण ही कंपनीत कामाला होती तर नराधम भाऊजी हा भाजीपाला विक्रीचा व्‍यवसाय करित होता. दरम्यान एकेदिवशी पीडितेची बहिण नेहमी प्रमाणे कंपनीत कामाला गेली होती. (Man Misbehave With Minor Girl, Accused Get Life Imprisonment In Aurangabad)

पीडिता ही घरात भांडी घासत असताना आरोपी तेथे आला त्‍याने बळजबरी करत तोंड दाबून पीडितेवर बलात्‍कार केला. त्यानंतर तुझे शिक्षण बंद करुन तुझ्या बहिणीला देखील ठार मारीन अशी धमकी दिली. त्‍यानंतर आरोपीने वारंवार पीडितेवर बलात्‍कार केला. ४ जुलै २०१३ रोजी पीडिता तिची बहिण व तिच्‍या मैत्रिणी असे केंब्रीज शाळेजवळील एका मंदिरात गेल्या होत्‍या. त्‍यावेळी पीडितेला अचानक चक्कर आली. त्‍यानंतर या बहिणीने पीडितेला रुग्णालयात नेले. हीच संधी साधत आरोपीने घरातील दागिने व रोख रक्कम घेवून पळ काढला. तर रुग्णालयात गेल्यानंतर पीडिता ही १८ आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. या प्रकरणात औरंगाबाद (Aurangabad) येथील मुकुंदवाडी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आलेला आहे.

प्रकरणात तपास अधिकारी उपनिरीक्षक ए. पी. भांगे यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणी वेळी, सहायक लोकाभियोक्ता उल्हास पवार यांनी यांनी १७ साक्षीतदारांचे जबाब नोंदवले. विशेष म्हणजे फिर्यादीच गुन्‍ह्यात फितूर झाली. त्‍यानंतरही मृत अर्भकाची करण्‍यात आलेली डीएनए चाचणी आणि परिस्थितीजन्‍य पुराव्‍या आधारे न्‍यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. त्यानंतर त्‍याला भादंवी कलम ३७६ (२)(i) आणि कलम ३७६ (२)(एन) मरेपर्यंत जन्‍मठेप आणि प्रत्‍येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे पीडितेला नुकसान भरपाई म्हणून दंडाची रक्कम आणि पोक्सोच्‍या कायद्याअंतर्गत नुकसान भरपाई देण्‍याचे आदेश देखील विधी व सेवा प्राधिकरणाला दिले.

गंभीर प्रकरण

सहायक लोकाभियोक्ता उल्‍हास पवार यांनी अशा किचकट प्रकरणात पीडिता फितूर होऊनही, केवळ परिस्थितीजन्‍य आणि अन्य पुराव्यांच्या आधारे गुन्‍हा सिध्‍द केला. त्यामुळे आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झाली. याबद्दल राज्याचे विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम व जिल्हा सरकारी वकील अॅड. अविनाश देशपांडे यांनी अॅड. उल्‍हास पवार यांचा सत्‍कार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT