Local Area Development Scheme Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : आमदार, खासदार निधीसाठी रोड फर्निचरचा समावेश बंधनकारक!

Local Area Development Scheme : रस्त्यांचे पंखे भरण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर येणार

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरात आमदार, खासदार निधीतून कोट्यवधींची रस्त्यांची कामे केली जात आहेत. मात्र, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर साइड पंखे भरले जात नसल्याने नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरण्याचे प्रकार वाढले आहेत.

त्यामुळे महापालिकेला उपाययोजना करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे महापालिकेने आमदार-खासदार निधीतून रस्त्यांची कामे करताना अंदाजपत्रकातच रोड फर्निचरचा समावेश करावा, अशी अट टाकली आहे.

आमदार-खासदार निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कामे केली जातात. त्यासाठी महापालिकेकडून नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. राज्यात सत्तांतर झाल्यापासून शहरात आमदार निधीतून कोट्यवधींची कामे केली जात आहेत.

रस्त्यांच्या कामांसाठी नाहरकत देताना महापालिका प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. कारण अनेक कामे ओव्हरलॅप होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक रस्त्याची स्थळ पाहणी करूनच नाहरकत दिली जात आहे.

ही कामे करताना कंत्राटदार फक्त रस्ता करून मोकळे होतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी साइड पंखे भरले जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते उंच, तर नागरिकांची घरे खाली अशी स्थिती शहराच्या अनेक भागांत आहे. पावसाचे पाणी घरात शिरल्यानंतर नागरिक महापालिकेकडे तक्रारी करतात. त्यानंतर महापालिकेला धावपळ करावी लागते.

कामाचा दर्जा संशयास्पद

आमदार, खासदार निधीतील कामे करताना कंत्राटदार घाई-गडबडीत कामे करतात. एक-दोन दिवसांत गल्लीबोळातील रस्ते उरकून कंत्राटदार बिले जमा करतात. या रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तपासणी होते का?

याची माहितीदेखील महापालिकेला दिली जात नाही. त्यामुळे प्रशासक जी. श्रीकांत यांनी प्रत्येक कामावर लक्ष ठेवून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश वॉर्ड अभियंत्यांना दिले होते, पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT