केशर आंबा गुणवत्ता केंद्राच्या रोपवाटिकेला शेतकऱ्यांची भेट
---
आधुनिक फलोत्पादन तंत्रज्ञानाचे घेतले प्रशिक्षण; दर्जेदार रोपांच्या निर्मितीवर भर
---
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. २९ ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्र परिसरातील केशर आंबा गुणवत्ता केंद्राच्या रोपवाटिकेला शेतकऱ्यांनी भेट देऊन फळपिकांच्या रोपवाटिका व्यवस्थापनाची माहिती घेतली. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचा हा भाग होता.
या प्रशिक्षणाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी आभासी माध्यमातून संबोधित केले. आधुनिक फलोत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन करताना त्यांनी दर्जेदार लागवड साहित्य, शास्त्रीय पद्धतीने रोपवाटिका व्यवस्थापन आणि सुधारित तंत्रज्ञानाच्या वापराचे महत्त्व सांगितले. या उपाययोजनांमुळे फळपिकांची उत्पादकता व गुणवत्ता वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांनी संरक्षित वातावरणातील रोपवाटिकेची पाहणी केली. फळपिकांची दर्जेदार रोपे तयार करण्याच्या आधुनिक पद्धती, रोपांची निगा, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण तसेच रोपवाटिकेतील विविध तंत्रज्ञानाविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. विशेषतः केशर आंब्यासह विविध फळपिकांच्या लागवडीसाठी गुणवत्तापूर्ण रोपांची निवड आणि निर्मिती यांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. या प्रशिक्षणाचे आयोजन फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी केले. रोपवाटिकेला दिलेल्या प्रत्यक्ष भेटीमुळे शेतकऱ्यांना आधुनिक फलोत्पादन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. या उपक्रमामुळे फळपिकांची उत्पादकता व गुणवत्ता वाढविण्यासह शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.