manja sellers municipal corporation action against 7 shop  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : मांजा विक्री करणाऱ्या सात दुकानांवर कारवाई

२०६० मीटर मांजा केला महापालिकेने जप्त

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : बंदी असताना शहरात नॉयलॉन मांजाची सर्रास विक्री केली जात आहे. रविवारी (ता. सात) स्मार्ट सिटी कार्यालयातील कर्मचाऱ्याचा मांजामुळे गळा कापला गेला. त्यामुळे प्रशासक जी. श्रीकांत यांनी बंदी असलेल्या मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार महापालिकेच्या नागरिक मित्र पथकाने दिवसभरात सात दुकानांवर कारवाई करून २०६० मीटर मांजा जप्त केला. न्यायालयाने हानिकारक नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. असे असतानादेखील शहरात राजरोसपणे मांजा विक्री केली जात आहे.

शनिवारी नॉयलॉन मांजामुळे स्मार्ट सिटीचे कर्मचारी जयेश बोरकर यांचा गळा कापला गेला होता. करंगळीला चार टाके पडले होते. याची गंभीर दखल घेऊन प्रशासक जी. श्रीकांत यांनी कारवाईचे आदेश दिले.

त्यानुसार उपायुक्त सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या पथकाने शहरातील ७३ मांजा व पतंग विक्री दुकानांची तपासणी केली. त्यातील सात दुकानामध्ये मांजा आढळून आला. त्यानुसार २०६० मीटर हानिकारक जप्त करत विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

बुढीलाईन, चांदमारी, गवळीपुरा, राजाबाजार, शहाबादनगर, गणेश कॉलनी, मिटमिटा, मुजफ्फरनगर, सिद्धार्थ नगर, चौधरी कॉलनी, रामनगर, जय भवानी चौक, झेंडा चौक, सिल्क मिल कॉलनी, राहुलनगर, उस्मानपुरा व पदमपुरा भागात तपासणी करण्यात आली. याठिकाणी पुन्हा हानिकारक मांजा आढळून आल्यास गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

विशेष पथकाची स्थापना

मनुष्यासह प्राण्यांसाठीही घातक ठरणाऱ्या नायलॉन मांजाविरोधात कारवाईसाठी ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी पोलिस ठाणेनिहाय विशेष पथकाची स्थापना केली. जिल्हाभरात कुठेही नायलॉन मांजानिर्मिती, पुरवठा तसेच दुकानदारांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

जिल्हाभरात ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (ता. आठ) ४९ ठिकाणी छापे टाकले. वैजापूर ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी ‘सकाळ’ला दिली.

नायलॉन मांजाचा साठा तसेच चोरटी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास नियंत्रण कक्ष ०२४०-२८१६३३ किंवा डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क करावा, संबंधितांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही पोलिस अधीक्षक कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ रिल्स अपलोड करणे पडले महागात; पुणे पोलिसांनी काढली धिंड

...आणि नीरजसाठी लिहिलेली चिठ्ठी बाबांनी वाचली; मृणाल दुसानिसने सांगितला लग्नाआधीचा मजेदार किस्सा

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोनं किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल, तर 'हे' स्वस्त उपाय केल्यास होईल धनप्राप्ती अन् माता लक्ष्मी होईल प्रसन्न

Jalgaon News : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरवर रुग्णांच्या नातेवाइकांचा आक्रमक हल्ला

Natural sleep remedies : तुमच्या डोक्यात रात्री खूप विचार येतात का? ताण कमी करून शांत झोप येण्यासाठी 'हा' घरगुती उपाय नक्की करा

SCROLL FOR NEXT