मन्नेरवारलू समाजाचे आज मार्गदर्शन शिबिर
नांदेड, ता. ३ : आदिवासी मन्नेरवारलू समाजाच्या प्रश्नांवर जनप्रबोधन करण्यासाठी तसेच विविध ज्वलंत प्रश्नांवर चर्चा व मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आदिवासी मन्नेरवारलू महासंघातर्फे विशेष मार्गदर्शन शिबिर व कार्यकारिणी घोषित करण्याचा सोहळा रविवार (ता. ४) सकाळी १० वाजता छत्रपती चौक, पूर्णा रोड येथील देवकृपा मंगल कार्यालयात होणार आहे.
महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मणराव ठक्करवाड अध्यक्षस्थानी राहणार असून, सचिव सुरेशराव अंबुलगेकर मार्गदर्शन करणार आहेत. उपाध्यक्ष मारोतीराव कंठेवाड यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कोषाध्यक्ष नामदेवराव मिठ्ठेवाड, सहसचिव व्यंकटराव सुरेवाड तसेच संचालक बाबुराव पुजरवाड, दत्तात्रेय अन्नमवाड, मोहनराव गोपुलवाड, दिलीपराव बास्टेवाड, नागनाथ अनंतवाड व गंगाधर गिरोड उपस्थित राहणार आहेत. शंकर कंतेवार, अधीक्षक अभियंता सुधाकर कचकलवार, माणिकराव पेरके, किशनराव लखमावार, अति. आयुक्त निलेश सुंकेवार, तहसीलदार संजय वारकड, संजय नागमवाड, सुनील माचेवाड, विजय येरावाड, इरलोड उपायुक्त महानगरपालिका, उद्योजक बालाजी कंठेवाड, सूर्यकांत मांकावार, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्हा व तालुकास्तरीय नवीन कार्यकारिणी जाहीर होणार आहे. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष मधुकर उन्हाळे व जिल्हा सचिव यलप्पा कोलेवाड यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.