मनोज जरांगे sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : आरक्षण मिळेपर्यंत राजकारण्यांना दूर ठेवा

मनोज जरांगे : करमाड येथील सभेत आवाहन

सकाळ वृत्तसेवा

करमाड : जातीपेक्षा राजकारण्यांना मोठं मानलं तर तुमच्या लेकरांचं वाटोळं झालं म्हणून समजा राजकारण करू नका असं मी म्हणणार नाही. परंतु मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत राजकारण्यांना दूर ठेवा. मैदानात लढायला शिका असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज पाटील जरांगे यांनी केले आहे.

शनिवारी (ता.२) दुपारी दोन वाजता करमाड येथे झालेले सभेत ते बोलत होते. यावेळी श्री जरांगे यांचा ताफा पिप्री मार्गे करमाड येथे त्यांच्यावर ४१ जीसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच २०० किलोंच्या हार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. हजारोच्या संख्येने उसळलेल्या जनसागराला श्री जरांगे संबोधित केले.

ते पुढे म्हणाले की, अशी संधी पुन्हा मिळणार नाही. सगळे सावध व्हा. मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळण्याची संधी जवळ आली आहे. ३२ लाख लोकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाले आहे. २४ डिसेंबरपर्यंत सरसकट आरक्षण मिळणार आहे. म्हणून सांगतो.

ही संधी वाया घालवू नका. राजकारणी लोकांचं विचित्र काम आहे. तुम्ही माझ्या पाठीशी राहिल्यास मी त्यांना पुरून उरतो. त्यांनी कितीही केसेस केल्या तरी मराठा त्यांना घाबरणार नाही. मराठ्यांची लेकरं मोठी होणार आहेत. म्हणून ते वेगवेगळे डाव टाकता असल्याचेही श्री जरांगे पाटील म्हणाले. यानंतर लाडसांवगीच्या सभेला जात असताना जयपूर चौक भाबंर्डा, दुधड आदी गावांत त्याचे जंगी स्वागत झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT