छत्रपती संभाजीनगर

दहा जणांसह जरांगे आज निघणार मुंबईला

CD
मनोज जरांगे आज मुंबईला निघणार --- समाजबांधवांना सध्या न येण्याचे आवाहन --- सकाळ वृत्तसेवा जालना, वडीगोद्री, ता. १४ : मुंबईतील उपोषणाला परवानगी नाकारली असली, तरी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मंगळवारी (ता. १५) सकाळी अकराला अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथून दोन वाहने, दोन रुग्णवाहिकांसह दहा जणांना सोबत घेऊन रवाना होणार आहेत. ‘‘ समाजबांधवांनी सध्या मुंबईत येऊ नये, योग्य वेळी मुंबईत बोलावले जाईल,’’ असे आवाहन जरांगे यांनी सोमवारी (ता.१४) पत्रकार परिषदेत केले. गेल्या शनिवारी (ता.१२) अंतरवाली सराटीत समाजबांधवांच्या राज्यस्तरीय बैठकीत जरांगे यांनी मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली होती व नियोजन जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी समाजबांधवांना मुंबईकडे येण्याचे आवाहन केले होते. प्रवासाच्या टप्प्यात तीन मुक्काम होणार होते व १९ सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर ते उपोषण सुरू करणार होते. मात्र, मुंबईतील उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली. परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच, असा निर्धार त्यांनी काल व्यक्त केला होता. त्यानुसार ते निवडक साथीदारांसह रवाना होणार आहेत. जरांगे यांच्या उपोषणाचा आज सतरावा दिवस होता. वैद्यकीय उपचारांमुळे प्रकृती काही प्रमाणात ठीक होती. मात्र, पोलिसांनी मुंबईला जाण्यास परवानगी नाकारल्यानंतर आपण औषधोपचार व पाणी घेणे बंद केले आहे; परंतु, मुंबईला जाण्याचा शब्द मागे घेणार नाही. माझ्या मार्गात कोणताही बदल होणार नाही. मात्र, सध्या समाजबांधवांना मुंबईत नेण्याचा निर्णय बदलला आहे. गणेशोत्सवाच्या काळात मराठा समाज मुंबईत येईल, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा डाव टाकून सरकारने परवानगी नाकारली आहे. आता मी एकटाच जातो. मला कोण अडवतो आणि परवानगी कशी नाकारली जाते, ते पाहू, असे आव्हान जरांगे यांनी दिले. कोट -- सण-उत्सवाच्या आडून सरकारने उपोषणाला परवानगी न देण्याचा डाव साधला आहे. प्रतिडाव म्हणून  माझ्या मार्गातील काटे आधी दूर करण्यासाठी आता मी एकटाच जातो. आझाद मैदानावर उपोषणाला बसल्यानंतर योग्य वेळी समाजबांधवांना मुंबईत बोलवीन. समाज संकटात सापडू नये, म्हणून हा निर्णय घेतला आहे. - मनोज जरांगे, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मुंबईला असे जाणार -- - अंतरवाली सराटीतून मंगळवारी (ता. १५) सकाळी अकराला निघणार. शहागड, गेवराई, मांजरसुंबा, बीड, पाटोदा, जामखेड, श्रीगोंदा, आष्टी, दौंड, उरळी कांचन, हडपसर, खोपोली मार्गे आझाद मैदान. - चार ठिकाणी मुक्काम ः १५ सप्टेंबर पाटोदा (जि. बीड), १६- श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर), १७- हडपसर (पुणे), १८- खोपोली (रायगड), १९ सप्टेंबर- आझाद मैदानावर उपोषण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT