Crowd in Muncipal office
Crowd in Muncipal office Sakal
छत्रपती संभाजीनगर

काहींचा हिरमोड तर काहींना सुखद धक्का!

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - महापालिकेची रखडलेली निवडणूक घेण्यासाठी अखेर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, गुरुवारी (ता. दोन) प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा व प्रभागांच्या हद्दींचा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला. हा नकाशा मुख्यालयात लावण्यात आल्यानंतर इच्छुक उमेदवारांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली. आराखडा व नकाशावर नागरिकांना सूचना आणि हरकती घेण्यासाठी १६ जूनपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

कोरोना संसर्ग व सर्वोच्च न्यायालयातील याचिकेमुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली होती. त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा विषय समोर आला. दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागला आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने १७ मेरोजी प्रभाग रचनेचे प्रारूप पाठविण्याचे आदेश दिले होते. महापालिकेने प्रभाग रचनेचे प्रारूप तयार केले पण ते व्हायरल झाले. असे असतानाच निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, गुरुवारी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा व प्रभागांच्या हद्दींचा नकाशा महापालिकेने प्रसिद्ध केला.

महापालिकेच्या मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, निवडणूक विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त डॉ. संतोष टेंगळे यांनी सूचना फलकावर आराखडा आणि नकाशा लावला. महापालिकेच्या टप्पा क्रमांक तीनच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर देखील नकाशा लावला. आराखडा व नकाशा प्रसिद्ध होताच महापालिकेच्या मुख्यालयात इच्छुकांनीची व नागरिकांची गर्दी झाली होती. प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा व प्रभागांच्या हद्दींचा नकाशा पाहून काहींचा हिरमोड झाला तर अपेक्षित भाग प्रभागात आल्याचे पाहताच काहींना सुखद धक्का बसला.

अशी पार पाडणार प्रक्रिया

यासंदर्भात डॉ. टेंगळे म्हणाले, की २७ मेरोजी निवडणूक आयोगाकडे प्रारूप आराखडा सादर केला होता. आयोगाच्या मान्यतेने प्रारूप आराखडा व हद्दींचा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यावर सूचना-हरकती घेण्यासाठी ता. दोन ते १६ जून २०२२ दरम्यानचा वेळ असेल. महापालिकेच्या निवडणूक विभागात त्या स्वीकारल्या जातील. हरकती-सूचनांचे विवरणपत्र १७ जूनला निवडणूक आयोगाकडे सादर केले जाईल. २४ जूनला सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतर प्राधिकृत अधिकाऱ्याने केलेल्या शिफारशी ३० जूनपर्यंत निवडणूक आयोगास पाठवल्या जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

SCROLL FOR NEXT