बिडकीन ,पैठण औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक पोलीसांच्या नजरकैदेत 
छत्रपती संभाजीनगर

मराठा मोर्चाचे समन्वयक पोलिसांच्या नजरकैदेत

ज्ञानेश्‍वर बोरुडे

लोहगाव (जि.औरंगाबाद) : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजवंदनासाठी औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) काळे झेंडे दाखवत ताफा अडविण्याच्या इशारा देणारे मराठा क्रांती ठोक मोर्चा (Maratha Kranti Thok Morcha) समन्वयक व स्वाभिमानी छावा मराठा संघटनेच्या ढाकेफळ-बिडकीन परिसरातील कार्यकर्त्यांना रात्रीच बिडकीन, पैठण औद्योगिक पोलिसांनी नजरकैदे केले आहे. शुक्रवार (ता.१७) मराठवाडा मुक्तीसंग्राम कार्यक्रमासाठी येणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे मराठा समाज आरक्षण व इतर प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी दुर्लक्ष करत आहे. यासाठी मराठा क्रांती ठोक (Aurangabad) मोर्चाने मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवूण काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने शहर व ग्रामीण भागातील मराठा समन्वयकांची गुरुवारी (ता.१६) रात्रीपासूनच धरपकड केली व सर्वांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

यात ढाकेफळ येथील मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक किरण काळे पाटील व कृष्णा पाटील उघडे यांना रात्री पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, तर बिडकीन ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी स्वाभिमानी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज पाटील मुरदारे, संतोष कुसेकर, दत्ता पाटील मोगल, विजय शेळके, आप्पासाहेब जाधव, अनिल कुटे, धनंजय चिरेकर, नारायण नरवडे, किशोर जाधव, गणेश जाधव यांना सकाळी आठ वाजता यांना ताब्यात घेतले.

आंदोलन तीव्र करणार

मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्या सरकारने तात्काळ मान्य कराव्यात.सरकारने मराठा समाजाला खोटी आश्वासने देऊन आमची फसवणूक केली आहे. आम्ही सर्व पदाधिकारी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवुन काळे झेंडे दाखवणार होतो. मात्र सरकार पोलीस प्रशासनाला पुढे करून आमच आंदोलन दडण्याचा प्रयत्न सतत करत आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आम्ही राज्यभरात तीव्र आंदोलन हाती घेतले असुन जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत एकाही मंत्री, खासदार, आमदाराला आम्ही कुठेही फिरकु देणार नाही.

किरण काळे पाटील, समन्वयक, मराठा क्रांती ठोक मोर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात मोठा बदल? पेन्शनधारकांना मिळू शकते ४५ हजारांची किमान पेन्शन

Pune Stunt Video : पुण्यात परप्रांतीय तरुणांचा मध्यरात्री धिंगाणा, दारूच्या नशेत भरधाव कारमधून जीवघेणी स्टंटबाजी अन्... व्हिडिओ व्हायरल

CIDCO Housing Lottery: स्वातंत्र्य दिनानिमित्त ४,७७९ घरांची लॉटरी सिडकोची 'ईडब्ल्यूएस'साठी संधी

Hardik Pandya Trade: मोठा ट्विस्ट! Mumbai Indians च्या हार्दिकला पुन्हा गुजरात टायटन्सकडे जायचंय, कर्णधार व्हायचंय; शुभमन गिलचं काय होणार?

Marathi News Live Updates : श्रावणात त्र्यंबकेश्वरचे व्हीआयपी दर्शन बंद

SCROLL FOR NEXT