हदगावमध्ये आज मराठा-कुणबी
जात प्रमाणपत्रासाठी शिबिर
---
हदगाव, ता.१५ (बातमीदार) : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा-कुणबी समाजाच्या हितासाठी नवीन शासन निर्णयानुसार हदगाव मंडळासाठी मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर बुधवारी (ता. १६) सकाळी १० वाजता मंडळ कार्यालय, हदगाव येथे होणार आहे.
महसूल विभाग, हदगाव मंडळ यांच्या वतीने आयोजित या शिबिरात नवीन शासन निर्णयानुसार अर्ज स्वीकारले जाणार असून, अर्जांची तात्काळ छाननी व पडताळणी केली जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. शिबिरासाठी अर्जदारांनी ओळखपत्र (आधार कार्ड), रहिवासी दाखला, शाळा किंवा महाविद्यालयाचा दाखला, पालक किंवा पूर्वजांच्या जुन्या नोंदी अथवा दाखले, ७/१२ उतारा तसेच आवश्यकतेनुसार इतर संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. मराठा-कुणबी समाजातील पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरास उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल विभाग, हदगाव मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.