Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

Video : जयंत पाटील यांच्या भाषणात मराठा संघटनांची घोषणाबाजी

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथील आधार मैदानावर 40 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे त्याची दखल घ्यावी, या मागणीसाठी मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री जयंत पाटील यांचे भाषण सुरू असतानाच घोषणाबाजी सुरू केली. यावेळी पाटील यांनी आपले भाषण सुरूच ठेवले.

भाजपने आपल्या कार्यकाळात नुस्त्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात मात्र काहीही काम केले नाही. त्यामुळे मागील काळात नगरपालिकांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे, अशा शब्दात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर टोलेबाजी केली. शनिवारी (ता.७) राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले, भाजपाने मोठमोठ्या घोषणा केल्या मात्र कामे काहीच केली नाही, आम्ही मात्र बोलत नाही, पण कृती करतो असे आमचे कामकाज सुरू आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी देखील महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवावी, अशी आमची अपेक्षा आहे. असं करत असताना आपल्याला किती जागा मिळतील, हे आताच सांगता येणार नाही मात्र कोणत्या वॉर्डात आपली किती ताकद आहे, त्याठिकाणी प्रभावी उमेदवार कोणता कुणाचा चांगला समज जनसंपर्क आहे अशा उमेदवारांचा विचार केला जाईल. 

पुढे ते म्हणाले, की ज्याला संधी मिळेल त्याला सर्वांनी मदत करायला हवी. तसेच आघाडीचा धर्म देखील पाळायला हवा लोकांचे काय प्रश्न आहेत हे समजून घेऊन ते कसे सुटतील हे जाहीरनाम्यात सांगावे लागणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला खाते उघडताना आलं नाही, याचा खेद वाटतो. यास काही आमच्या काही स्थानिक पातळीवरच्या चुका आहेत अशी कबुलीही श्री. पाटील यांनी यावेळी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjaykaka Patil Sangli : संजयकाका पाटील पुन्हा भाजपवासीय होणार, चंद्रकांत दादा सुनेत्रा पवारांचे नाव घेत म्हणाले, तासगावचे राजकारण पुन्हा बदलणार

IPL 2026: 'तूझे सिक्रेट्स अन् आतल्या गोष्टी माहितीयेत, त्यामुळे ...' वैभव सूर्यवंशीसोबतच्या चर्चांवर ईशान किशानचा खुलासा

काहींचा आग्रह, तर कुणाला हवी मुदत! मराठीच्या मुद्द्यावरून रिक्षा संघटनांत गट

Latest Marathi News Live Update: स्कार्पिओचा टायर फुटून समृद्धी महामार्गावर अपघात; पाच जण जखमी

iPhone Fold या iPhone Ultra! कोणत्या नावाने लॉन्च होणार Apple चा पहिला फोल्डेबल फोन? किंमत किती असणार पाहा

SCROLL FOR NEXT