manoj jarange sakal
छत्रपती संभाजीनगर

Maratha Reservation : मंत्री मामा म्हणाला कोपऱ्यात चला...! फुलंब्रीत जरांगे पाटलांनी सांगितली उपोषणावेळची आठवण

खुलताबाद मार्गे फुलंब्री आल्यानंतर सर्वप्रथम जेसीबीच्या माध्यमातून मनोज रंगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

नवनाथ इधाटे

फुलंब्री - मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळे मराठ्यांच्या वेदना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून या सरकारने ते लक्षात घ्याव, याचा उद्रेक झाला तर सरकारला महागात पडेल असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले. फुलंब्री शहरांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन सोमवारी (ता.नऊ) रोजी करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

खुलताबाद मार्गे फुलंब्री आल्यानंतर सर्वप्रथम जेसीबीच्या माध्यमातून मनोज रंगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून जिजाऊ वंदना झाली. त्यानंतर मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सरकारला चाळीस दिवस दिले आहे. त्यानंतरचा 41 वा दिवस हा आपला असणार आहे.

कोणत्याही परिस्थितीत आता आरक्षण घेतल्याशिवाय सरकारची सुट्टी नाही. त्यामुळे ही एकजूट सुटू देऊ नका. समाजाच्या वेदना दिवसेंदिवस मोठ्या वाढू लागले आहे. मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळे सरकारने मराठ्यांच्या वेदना लक्षात घ्याव्यात, सरकारने भावना शून्य होऊ नये. अंतरवाली सराटी येथे सरकारने विविध कलमाच्या माध्यमातून आमच्यावर गुन्हे दाखल केले. त्या आम्ही आमच्या पद्धतीने सरकारला मागे घेण्यासाठी भाग पाडू.

समाजासाठी मी कधीही गद्दारी केली नसून चार भिंतीच्या आत न बोलता खुल्या व्यासपीठावर सरकारशी चर्चा केली आहे. समाजाला एकदा मायबाप म्हटल्यानंतर समाजाशी गद्दारीकरण आहे माझ्या रक्तात नाही. त्यामुळे येणाऱ्या 14 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे मोठ्या संख्येने आपण सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना केले आहे.

मराठ्यांच्या पोरांना आत्महत्या करू नका •

मराठा आरक्षणासाठी आपण सर्वजण रात्रंदिवस परिश्रम घेऊन सरकारकडून आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. त्यामुळे मराठ्यांच्या पोरांनो तुम्ही आत्महत्या करू नका. तुम्ही जर आत्महत्या केल्या तर आम्ही आरक्षण घ्यायचे कोणासाठी असा प्रश्न यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

मंत्री मामा म्हणाला... कोपऱ्यात चला...! •

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मी उपोषणासाठी बसलो असताना आमच्यावर लाठी चार्ज झाला. त्यानंतर मराठा समाज बांधवांनी ठिकठिकाणी आंदोलन केले. हे लक्षात घेऊन अनेक मंत्र्यांनी माझ्या उपोषण स्थळी येऊन भेट दिली. त्यातील एक मंत्री मामा मला म्हणाला..कोपऱ्यात चला..? मी कोपऱ्यात न जाता त्यालाच सांगितलं तू स्टेजच्या खाली उतर, काय असेल ते इथेच बोल चार भिंतीत मी येणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सभेत सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT