maratha reservation st bus service closed 25 lakh loss chhatrapati sambhajinagar Sakal
छत्रपती संभाजीनगर

Maratha Reservation : बससेवा बंद, पैठण आगाराला ६ दिवसांत २५ लाखांचा फटका

आंदोलन काळात ६६ बस आगारातच उभ्या

चंद्रकांत तारु

पैठण : मराठा समाजाच्या आरक्षणाची धग लक्षात घेता छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयाच्या आदेशानुसार रविवारी या. २९ ऑक्टोबरपासून सर्व बसेस आगारात उभ्या करण्यात आल्या. त्यामुळे पैठण येथील एस. टी. आगाराला सहा दिवसात दिवसात २५ लाखांचा फटका सहन करावा लागला आहे. आता शुक्रवारी (ता.३) पैठण आगाराची प्रवाशांसाठी एसटी बससेवा सुरु करण्यात आली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शहर तसेच तालुकाभर आमरण व साखळी उपोषण सुरू होते. २९ ऑक्टोबरपासून विभागीय कार्यालयाने शासनाच्या सुचनेप्रमाणे पैठण आगाराला सर्व बसेस आगारामध्ये लावाव्यात, अशा सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे आगार व्यवस्थापनाकडून ६६ बसच्या ग्रामीण व लांब पल्ल्याच्या सर्व फेऱ्या रद्द करत संपूर्ण बसेस आगारामध्ये उभ्या करण्यात आल्यह होत्या.

जिल्ह्यातील आगारात पैठण आगाराचा उत्पन्नाच्या बाबतीत प्रथम क्रमांक आहे. परंतु गेल्या सहा दिवसांच्या मराठा आंदोलन काळात बसेस आगारामध्ये उभ्या केल्यामुळे आगाराला जवळपास २५ लाखांचा फटका बसला आहे. बसस्थानकात कोणीही येऊ नये म्हणून शहर पोलिसांनी कठडे लावले होते.बसचे नुकसान होऊ नये, यासाठी पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी विशेष नियंत्रण आगारावर ठेवले होते.

प्रवाशांची लूट, बंद काळात खासगी वाहनांची चांदी

मागील सहा दिवसांच्या काळात एसटी बस बंद राहिल्याने खासगी वाहने बसस्थानक परिसरात येऊन प्रवाशांना घेऊन जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. बाजारपेठेत आलेल्या नागरिकांना घरी जाण्यासाठी बसेस नसल्यामुळे खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. परिणामी खासगी वाहनचालकांनी अव्वाच्या सव्वा भाडे घेतले. यामुळे आंदोलनाचा भुर्दंड प्रवाशांना ही सहन करावा लागला आहे.

मराठा आरक्षण आंदोलन काळात बसेसची जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या. जिल्ह्यातही बसेसवर दगडफेकीच्या घटना झाल्या. प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने बसफेऱ्या थांबविण्याचे आदेश मिळाले. त्यामुळे पैठण बसस्थानकातून एकही बस बाहेर सोडली नाही. यामुळे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. आता आंदोलन स्थगित झाल्यामुळे एसटी बससेवा वरिष्ठांच्या आदेशानुसार सुरु करण्यात आल्या आहेत.

— गजानन मडके, आगार प्रमुख, एसटी बसस्थानक, पैठण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT