ABD26J80898
हडको : काव्यमैफलीला उपस्थित ‘टेरेसवरील कविता परिवारा’चे सदस्य.
-----
अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त काव्यमैफल
हडको, ता. ८ : टेरेसवरील कविता परिवार आणि ध्यास गझल समूहाच्या वतीने संजय पवार यांच्या निवासस्थानी अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त काव्यमैफल रंगली. प्रा. विजय पोहनेरकर, नारायण पांडव, प्रा. ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात झाली.
मैफलीत गिरीश जोशी यांच्या ‘भाव खातो केवढा’ या शेराला रसिकांनी दाद दिली. अश्विनी विटेकर यांच्या ‘स्वप्न सुखाचे पाहत जगल्या काही बाया’ या शेरानेही लक्ष वेधले. अजय त्रिभुवन यांनी ‘दिला नाहीस दुसरा एकही पर्याय आम्हाला...’ या शेरातून, तर अमेय तांदुळजे यांनी ‘जन्म फुलाचा घातक होता...’ या रचनेतून गझल सादर केली. मनोरमा बोराडे यांनी ‘शब्द बसले रेषेवरी अन् ओळ झाली...’, तर तन्वी न्यायाधीश यांनी ‘शब्द बांधू शकतात पूल दोन माणसांत...’ या ओळींतून शब्दांची ताकद मांडली. संजय पवार, अर्जुन गायकवाड, शीतल सराफ, सुनीता कपाळे व विजय पांचाळ यांनीही सुरेख रचना सादर केल्या. सूत्रसंचालन सुहास महाजन व गिरीश जोशी यांनी केले. प्रा. विजय पोहनेरकर यांच्या कवितेने कार्यक्रमाची सांगता झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.