छत्रपती संभाजीनगर

क्रिकेटप्रेमींना दर्जेदार सामने अनुभवण्याची संधी

CD
पान चार अँकर --- क्रिकेटप्रेमींना दर्जेदार सामने अनुभवण्याची संधी मराठवाडा चॅम्पियन्स लीगच्या लोगोचे अनावरण, नव्या खेळाडूंना संधीची दारे खुली नांदेड, ता. १८ : मराठवाड्यातील गुणवान क्रिकेटपटूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी हक्काचे आणि दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येत असलेल्या मराठवाडा चॅम्पियन्स लीग (एमसीएल)-२०२६च्या लोगोचे उत्साहपूर्ण वातावरणात अनावरण करण्यात आले. या सोहळ्यामुळे आगामी क्रिकेट स्पर्धेची उत्सुकता खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींमध्ये वाढली आहे. मराठवाडा चॅम्पियन्स लीग-२०२६ चे शीर्षक प्रायोजक विश्वगुरू इन्फोटेक आहे. विश्वगुरू इन्फोटेकचे संस्थापक गंगार्डे यांच्या हस्ते स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी लातूर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अभिजित देशमुख, माजी रणजीपटू प्रसाद कानडे, स्पर्धेचे आयोजक बी.एम. घोलप यांच्यासह क्रिकेट क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. मराठवाड्यात क्रिकेटची मोठी परंपरा असून, या भागात अनेक गुणवान खेळाडू आहेत. मात्र, त्यांना आपली गुणवत्ता मोठ्या व्यासपीठावर सिद्ध करण्याची संधी मर्यादित प्रमाणात मिळते. ही उणीव भरून काढण्याच्या उद्देशाने एमसीएलचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक खेळाडूंना दर्जेदार आणि स्पर्धात्मक क्रिकेटचा अनुभव मिळावा, त्यांच्यातील कौशल्य विकसित व्हावे तसेच नवोदित खेळाडूंना पुढे जाण्याची संधी मिळावी, हा या लीगचा प्रमुख उद्देश आहे. या चार शहरांत रंगणार स्पर्धेचे सामने ता. दोन ते १८ नोव्हेंबरदरम्यान लातूर, नांदेड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या चार शहरांत स्पर्धेचे सामने रंगणार आहेत. त्यामुळे मराठवाड्याच्या विविध भागांत क्रिकेटचा उत्साह पाहायला मिळणार असून, क्रिकेटप्रेमींना दर्जेदार सामने अनुभवण्याची संधी मिळणार आहे. या लीगमध्ये मराठवाड्यातील विविध भागांतील खेळाडूंना सहभागी होऊन आपली गुणवत्ता सिद्ध करता येणार आहे. त्यामुळे स्थानिक क्रिकेटपटूंसाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे. एमसीएलच्या माध्यमातून मराठवाड्यातील क्रिकेटला व्यापक व्यासपीठ मिळण्याबरोबरच नव्या खेळाडूंना संधीची दारे खुली होणार आहेत. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT