CORONA.jpg 
छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यात कोरोनाने १०८ जणांचा मृत्यू, तीन हजार ३२६ जणांना नव्याने बाधा

औरंगाबादेत १८ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत २ हजार ९२२ जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : मराठवाड्यात (Marathwada Corona Updates) रविवारी (ता. १६) दिवसभरात ३ हजार ३२६ कोरोनाबाधित (Corona) आढळले. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी; बीड (Beed) ८९७, औरंगाबाद (Aurangabad) ६६९, उस्मानाबाद (Osmanabad) ४९२, लातूर (Latur) ३९५, जालना (Jalna) २७६, नांदेड (Nanded) २७३, परभणी (Parbhani) २५३, हिंगोली (Hingoli) ७१. उपचारादरम्यान आणखी १०८ जणांचा मृत्यू झाला. त्यात लातुरमध्ये ३७, औरंगाबाद १८, परभणी १४, नांदेड १०, उस्मानाबाद- बीडमध्ये प्रत्येकी ९, जालना ६, हिंगोलीतील पाच जणांचा समावेश आहे. (Marathwada Corona Updates Above 3 Thousand Covid Cases Reported)

औरंगाबादेत १८ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत २ हजार ९२२ जणांचा मृत्यू झाला आहे. बिडकीन (ता. पैठण) येथील पुरुष (वय ५०), आडेगाव (जि. औरंगाबाद) येथील महिला (७०), सिडको एन-आठ, कोर्ती हाउसिंग सोसायटीतील पुरुष (३२), हर्सूल सिटी येथील महिला (७२), जरंडी (ता. सोयगाव) येथील महिला (६०), एसबीएच कॉलनी औरंगाबाद येथील महिला (७५), पिरोळा (ता. सिल्लोड) येथील पुरुष (७३), चेतनानगर, हर्सूल येथील महिला (५१), कारखाना फुलंब्री येथील महिला (३०), शंभूनगर औरंगाबाद येथील महिला (५२), भंबरवाडी (ता. कन्नड) येथील पुरुष (३४), वाहेगाव (ता. गंगापूर) येथील पुरुष (७०), हनूमाननगर, पैठण येथील पुरुष (६०), अंबिकानगर, औरंगाबाद येथील महिलेचा (६५) घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्हा रूग्णालयात व खासगी रुग्णालयात प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला.

औरंगाबादेत आणखी ७५४ रुग्ण बरे

औरंगाबाद जिल्ह्यात ६६९ कोरोनाबाधितांची भर पडली. त्यात शहरातील २०६, ग्रामीण भागातील ४६३ जणांचा समावेश आहे. रुग्णांची संख्या १ लाख ३७ हजार ४४ झाली. बरे झालेल्या आणखी ७५४ रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यात शहरातील १३०, ग्रामीण भागातील ६३४ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत १ लाख २७ हजार ५३२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ६ हजार ५९० जणांवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT