corona updates corona updates
छत्रपती संभाजीनगर

Corona Updates: मराठवाड्यात १२३ जणांचा मृत्यू, २४ तासांत सात हजार सातशे रुग्ण

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात एक हजार ३८८ कोरोनाबाधितांची भर पडली

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात कोरोनामुळे आणखी १२३ जणांच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (ता. १६) झाली. त्यात औरंगाबादेतील २७, नांदेड २५, उस्मानाबाद २३, लातूर २०, परभणी १६, हिंगोली पाच, बीड चार तर जालन्यातील तिघांचा समावेश आहे.

दिवसभरात सात हजार ७०१ कोरोनाबाधितांची भर पडली. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी - लातूर एक हजार ७६७, औरंगाबाद एक हजार ३८८, नांदेड एक हजार ३५१, बीड एक हजार पाच, परभणी ७३५, जालना ६४१, उस्मानाबाद ५८०, हिंगोली २३४.

२७ कोरोनाबाधितांचा मृत्यू-

शिवाना (ता. सिल्लोड) येथील पुरुष (वय ५०), एसटी कॉलनी, कटकटगेट येथील महिला (६५), सिल्लोडमधील महिला (४५), गारखेड्यातील महिला (६४), हनुमान खेडा (ता. सोयगाव) येथील महिला (६०), बाजार गल्ली (ता. फुलंब्री) येथील महिला (७०), संजयनगरातील महिला (६५), गंगापुरातील महिला (६०), सुधाकरनगर, बीड बायपास येथील महिला (५६), भाडली (ता. वैजापूर) येथील महिला (८०), संभाजी कॉलनी सिडको एन-सहा येथील महिला (६५), सिल्लोडमधील पुरुष (४५), अजिंठा येथील महिला (८०), जयसिंगपुरा येथील महिला (७२), माळीवाडा येथील पुरुष (६९), गेवराई बाशी (ता. पैठण) येथील पुरुष (५५), मुदेश वडगाव (ता. गंगापूर) येथील पुरुष (६५), पानवडोद (ता. सिल्लोड) येथील पुरुष (६५), पडेगाव येथील पुरुष (७७), वडगाव कोल्हाटी येथील महिलेचा (६८) घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन तर खासगी रुग्णालयांत चार जणांचा मृत्यू झाला.

कोरोना मीटर (औरंगाबाद)-

आतापर्यंतचे बाधित १०५९७१

बरे झालेले ८७९९३

उपचार सुरू १५८७६

आतापर्यंत मृत्यू २१०२

औरंगाबादेत आतापर्यंत ८८ रुग्ण बरे-

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात एक हजार ३८८ कोरोनाबाधितांची भर पडली. रुग्णसंख्या एक लाख ५९७१ वर पोचली. सध्या १५ हजार ८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या आणखी एक हजार २८१ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ८७ हजार ९९३ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, आणखी २७ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत दोन हजार १०२ जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT