छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यात ८,७९६ कोटींची गुंतवणूक

CD
मराठवाड्यात ८,७९६ कोटींची गुंतवणूक --- छत्रपती संभाजीनगर, जालन्यात पाच प्रकल्प, सुमारे ९,८५० रोजगारांच्या संधी --- सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. ३ : इन्व्हेस्ट महाराष्ट्रअंतर्गत राज्य शासनाने ६५ कंपन्यांसोबत तब्बल ८.५ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. या सामंजस्य करारांमध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांचा समावेश असून, या दोन जिल्ह्यांतील पाच प्रकल्पांद्वारे एकूण ८,७९६ कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक होणार आहे. त्याद्वारे सुमारे ९,८४७ रोजगारांच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शासन आणि कंपन्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, ‘एनपीएसपीएल ॲडव्हान्स मटेरियल लिमिटेड छत्रपती संभाजीनगरा’त पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यातून तीन हजार रोजगार अपेक्षित आहेत. या प्रकल्पाचा संबंध धातू व खाणकाम क्षेत्राशी आहे. छत्रपती संभाजीनगरातील ‘स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेड’च्या प्रकल्पासाठी २,७९० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. शेंद्रा आणि वाळूज येथे होणाऱ्या या प्रकल्पातून ५,१४७ रोजगार निर्माण होण्याची माहिती देण्यात आली आहे. हा प्रकल्प डेटा सेंटर, माहिती-तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमी कंडक्टर क्षेत्राशी संबंधित आहे. याशिवाय ‘ए अँड एस इंजिनिअरिंग’कडून छत्रपती संभाजीनगरात ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून, त्यातून एक हजार रोजगार अपेक्षित आहेत. ‘व्होरॉक इंजिनिअरिंग’कडूनही छत्रपती संभाजीनगरात २०६ कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ४०० रोजगारांची तरतूद प्रस्तावित आहे. जालना जिल्ह्यात ‘नेचर इको’कडून ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स, बांधकाम, धातू व खाणकाम क्षेत्रातील या प्रकल्पातून सुमारे ३०० रोजगार निर्माण होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील ६५ कंपन्यांसोबत झालेल्या करारांतून सुमारे ८.५ लाख कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक आणि २.९१ लाख रोजगारांच्या संधी निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. या मोठ्या गुंतवणूक आराखड्यात मराठवाड्यातील प्रकल्पांचा वाटा छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक विस्तारासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. --- मराठवाड्यातील प्रकल्प कंपनी ः ठिकाण ः गुंतवणूक ः रोजगार एनपीएसपीएल ॲडव्हान्स मटेरियल ः छत्रपती संभाजीनगर ः ५,००० कोटी ः ३,००० स्टरलाइट टेक्नॉलॉजीज ः शेंद्रा, वाळूज ः २,७९० कोटी ः ५,१४७ ए अँड एस इंजिनिअरिंग ः छत्रपती संभाजीनगर ः ३०० कोटी ः १,००० व्हरॉक इंजिनिअरिंग ः छत्रपती संभाजीनगर ः २०६ कोटी ः ४०० नेचर इको ः जालना ः ५०० कोटी ः ३०० एकूण ः संभाजीनगर, जालना ः ८,७९६ कोटी ः ९,८४७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: हॉकीत भारतच आशियाचा राजा! महिलांनंतर पुरुष संघानेही जिंकलं गोल्ड मेडल; ऑलिम्पिक तिकीटही पक्के

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

SCROLL FOR NEXT