मराठवाडा मुक्तिसंग्राम
दिनानिमित्त आंदोलनांना बंदी
----
सतरा सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत आदेश लागू
----
नांदेड, ता. १५ : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७८व्या वर्धापन दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी शहरात विविध कार्यक्रम होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नांदेड शहरातील विविध भागांत आंदोलनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी १४ सप्टेंबर रोजी याबाबत आदेश जारी केला.
त्यानुसार, १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहापासून १७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत उपोषण, आत्मदहन, धरणे, मोर्चा, रॅली, सत्याग्रह आदी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यास बंदी राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, वजिराबाद तसेच माता गुजरीजी विसावा उद्यान परिसरात हा आदेश लागू राहील. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा–महात्मा गांधी पुतळा परिसर, शिवाजीनगर, आयटीआय चौक ते अण्णा भाऊ साठे चौक, कुसुम सभागृह ते रेल्वे स्थानक मार्ग आणि शासकीय विश्रामगृह ते एसटी ओव्हरब्रिज परिसराचाही आदेशात समावेश आहे. विविध मागण्यांसाठी आंदोलक शहरात येण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.