bharatbandh 
छत्रपती संभाजीनगर

#BharatBandh: मराठवाड्यात भारत बंदला मिळतोय मोठा पाठिंबा; जाणून घ्या जिल्ह्यांतील परिस्थिती

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: #BharatBandh: वस्तू व सेवाकरातील (जीएसटी) जाचक अटी व तरतुदीच्या विरोधात आज देशभर बंद पाळण्यात येत आहे. यासाठी राज्यासह मराठवाड्यातही विविध व्यापारी संघटना तसेच मोठे व्यापारी एकवटल्याचे चित्र दिसत आहे. 

जीएसटी कायद्यातील जाचक अटी रद्द कराव्यात अशी व्यापारी संघटनांची मागणी आहे. त्यासाठी आज देशभरात व्यापारी संघटनांनी भारत बंद आंदोलनाची हाक दिली आहे. आजच्या भारत बंदला मराठवाड्यातून मोठा प्रतिसाद दिसत आहे. शहरांसह ग्रामीण भागात लहानमोठ्या व्यापाऱ्यांनी व्यवसाय बंद ठेवून या बंदला पाठिंबा दर्शविला आहे.

उस्मानाबाद-
जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बंदला पाठींबा दर्शविला असून शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

जीएसटीच्या जाचक अटी रद्द कराव्यात. गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही मागण्या करत आहोत, त्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आज आम्ही उस्मानाबाद शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कडकडीत बंद पाळीत आहोत
संजय मंत्री ( अध्यक्ष, जिल्हा व्यापारी संघ उस्मानाबाद)

औरंगाबाद-
औरंगाबादमध्ये जिल्हा महासंघाशी सलग्न असलेल्या सर्व व्यापारी संघटनानी बंदला पाठिंबा दिल्यामुळे आज कडकडीत बंद पाळला जात आहे. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे आणि त्यांचे सहकारी शहरात फिरून कडकडीत बंद पाळला जात आहे का नाही ते पाहत आहेत.

जालना-
मोठ्या व्यापाऱ्यांनी बंदला पाठींबा दिला आहे. सगळे घाऊक व्यापार बंद आहेत. जीएसटीतील जाचक अटींविरोधात अडत व्यापाऱ्यांनीही बंद पाळल्याने जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे. शहरांसह ग्रामीण भागात बंदला प्रतिसाद

लातूर- कोरोनामुळे शहरात पुढील दोन दिवस कर्फू असल्याने बंदला समिश्र प्रतिसाद मिळत आहे.

जीएसटी करप्रणालीतील जाचक तरतूदी रद्द कराव्यात तसेच यासह अन्य मागण्यांसाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स'ने (कॅट) भारत बंदची हाक दिली आहे. त्यास व्यापारी महासंघ तसेच संलग्न असलेल्या सर्व व्यापारी संघटनेचा पाठिंबा असून शुक्रवारी व्यापारीवर्ग आपआपले दुकाने, प्रतिष्ठाने बंद करुन या बंदमध्ये सहभागी झाली आहेत.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT