Marathwada Sakal Anniversary sakal
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Sakal Anniversary : उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर; शहर, जिल्ह्यातील बातमीदारांचा वर्धापनदिनी गौरव

वाचकांचा २५ वर्षांचा विश्वास जपत ‘सकाळ’ आता मराठवाड्याचा श्वास बनला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - वाचकांचा २५ वर्षांचा विश्वास जपत ‘सकाळ’ आता मराठवाड्याचा श्वास बनला. मराठवाड्याच्या मातीत रुजलेल्या, निष्पक्ष, विकासाभिमुख, विधायक पत्रकारिता आणि सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून विविध उपक्रम राबवित दमदार वाटचाल करणाऱ्या या वर्तमानपत्राचा मराठवाडा आवृत्तीचा रौप्यमहोत्सवी (२५ वा) वर्धापन दिन शनिवारी (ता. एक जून) दिमाखात साजरा होत आहे.

या दिवशी ‘सकाळ’च्या शहर आणि ग्रामीण बातमीदारांचा ‘सकाळ उत्कृष्ट पत्रकारिता’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये शहर बातमीदार विजय देऊळगावकर, सुनील इंगळे, सचिन पवार, पृथा वीर, छायाचित्रकार सचिन माने, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण बातमीदार सचिन चोबे (सिल्लोड), नवनाथ इधाटे (फुलंब्री), हबीब पठाण (पाचोड, ता. पैठण) यांचा समावेश आहे.

मराठवाड्यात २५ वर्षांची समर्थ वाटचाल ‘सकाळ’वर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या साथीने, सहकार्याने आनंददायी झाली. या वाटचालीत विधायक, विकासाभिमुख, रचनात्मक, उत्तरदायी अशा पत्रकारितेच्या विविध मूल्यांची जाण ठेवणाऱ्या बातमीदारांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांचा वर्धपानदिनी गौरव केला जाणार आहे.

मराठवाड्याच्या विकासाचे ध्येय ठेवून ‘सकाळ’ आणि या दैनिकाचे बातमीदार, छायाचित्रकार यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, औद्योगिक यांसह अनेक क्षेत्रांतील प्रश्‍नांना वाचा फोडून ते मार्गीही लावले. त्यातूनच वाचकांशी एक विश्‍वासाचे नाते तयार झाले. ‘सकाळ’ एक विधायक वर्तमानपत्र ही ओळख आपणा सर्वांना माहितीच आहे.

यामध्ये योगदान देणारे ‘सकाळ’चे शहर बातमीदार देऊळगावकर, इंगळे, पवार, वीर, छायाचित्रकार माने, ग्रामीण बातमीदार चोबे (सिल्लोड), इधाटे (फुलंब्री), पठाण (पाचोड, ता. पैठण) यांचा शनिवारी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे गौरव करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT