Crime sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थिनींचे अपहरण करण्याचा प्रयत्न; बुलेटस्वार फरार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात टवाळखोरांमुळे विद्यार्थिनींसह विद्यापीठातील महिलांना तसेच बाहेरगावाहून येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात टवाळखोरांमुळे विद्यार्थिनींसह विद्यापीठातील महिलांना तसेच बाहेरगावाहून येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. गुरुवारी (ता. ८) रात्री आठच्या सुमारास दुचाकीस्वार तिघांच्या टोळक्याने वाय कॉर्नर परिसरात तीन विद्यार्थिनींची छेड काढली.

यातील एकीला दुचाकीवरून उचलून नेण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थिनींनी आरडाओरड केल्यावर परिसरातील विद्यार्थी मदतीला धावले. त्यामुळे टवाळखोरांनी बुलेटवरून पळ काढला. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती निरीक्षक रेखा लोंढे यांनी दिली.

दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारी विद्यापीठात ‘नायलिट’ (निलेट) संस्था आहे. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास या संस्थेतील तीन विद्यार्थिनी वसतिगृहातून बाहेर पडल्या. रस्त्याने फिरत-फिरत त्या विद्यापीठातील मुख्य रस्ता वाय पॉइंटपर्यंत चालत आल्या.

बराच वेळ चालल्यानंतर अंदाजे पावणेआठ वाजता विद्यार्थिनी विश्रामगृहापासून पुढे गेल्यानंतर दुचाकीवर ट्रिपल सीट आलेल्या टवाळखोरांनी त्यांना गाठले. त्यांची छेड काढायला सुरवात केली. मात्र, रात्रीची वेळ असल्याने घाबरलेल्या मुलींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर दुचाकी थांबवून दोन टवाळखोर त्या विद्यार्थिनींकडे चालत गेले. त्यांनी एका विद्यार्थिनीचा हात धरला. तिला पकडून दुचाकीकडे ओढण्याचा प्रयत्न केला.

दुचाकीवर बसून आमच्यासोबत चल, अशी धमकी टवाळखोर तिला देत होते. आधीपासून भीतीपोटी शांत असलेल्या विद्यार्थिनींनी यानंतर मदतीसाठी आरडाओरड करताच परिसरातील विद्यार्थी मदतीला धावून गेले. त्यानंतर तिघे टवाळखोर बुलेटवरून पळून गेले. त्यानंतर लगेचच मुलांनी डायल ११२ वरून पोलिसांना माहिती दिली. काही क्षणात पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

घाबरलेल्या दोघींवर रुग्णालयात उपचार

या प्रकारामुळे तिन्ही विद्यार्थिनी प्रचंड भेदरल्या होत्या. त्यांना उपचाराची गरज असल्याचे पाहून पोलिसांनीच त्यांना घाटीत दाखल केले. गुरुवारी मध्यरात्री १ वाजेपर्यंत दोन मुलींवर उपचार केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. तीनपैकी दोन मुलींची प्रकृती शुक्रवारीदेखील बिघडल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT