sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : जिल्हाधिकारी कार्यालयावर लाल वादळ

राज्यव्यापी संप : अंगणवाडी सेविकांचा मोर्चा, आंदोलनाचा चौथा दिवस

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : आयटकच्या अंगणवाडी कर्मचारी युनियनने राज्यव्यापी संप पुकाराला आहे. चौथ्या दिवशी गुरुवारी (ता. सात) अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यामध्ये वैजापूर, गंगापूर, पैठण, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, शहर, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, कन्नड, खुलताबाद आदी तालुक्यांतील १७ प्रकल्पांमधील पाच हजार अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.

प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) नीलेश राठोड यांना निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेसमोर मोर्चातील महिलांची संख्या बघून पोलिसांनी लेबर कॉलनीतील रिकाम्या झालेल्या मैदानात मोर्चाचे विसर्जन करण्यास सांगितले. आयटकने मात्र महात्मा फुले पुतळा, औरंगपुरा, गुलमंडी मछली खडक, सिटी चौक, गांधी पुतळा मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

मोर्चाचे नेतृत्व अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटकचे राज्य उपाध्यक्ष प्रा. राम बाहेती, जिल्हा सचिव व राज्य कोषाध्यक्ष तारा बनसोडे, राज्य सचिव शालिनी पगारे, संघटक अनिल जावळे, संगीता अंभोरे, मीरा आडसरे, उषा शेळके, गीता पांडे, ज्योती गायकवाड, माया भिवसाने, शीला साठे, वैशाली मकासरे, नूर जहा बेगम, शन्नो शेख, विलास शेंगुळे, प्रीतम घनघावे, अभय टाकसाळ, रंजना राठोड, अलका डिडोरे, गंगा जंजाळ, उषा गलांडे, अनिता पावडे, नीता कीर्तीशाही, वैशाली मकासरे, अर्चना घाटे, अनिता जाधव, राजेश्री रेड्डी आदींनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या जाहीर सभेत जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस संजय महालंकर, लालबावटा शेतमजूर युनियनचे सिल्लोडचे पुढारी त्र्यंबक शेजूळ आदींची भाषणे झाली.मोर्चात तब्बल पाच हजार महिला सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा एकीकडचा रस्ता पूर्णपणे पाच तास बंद होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : टीव्हीके-काँग्रेस आघाडीला नवीन नाव

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT