छत्रपती संभाजीनगर

कमी पावसामुळे यंदा झेंडूची शेती कोमेजली

CD
प्रतिकूल स्थितीतही झेंडू उत्पादकांची जिद्द - दिवाळीत फुले बाजारात; थेट विक्रीतून नफा मिळवण्याचा प्रयत्न सेनगाव, ता. ८ (बातमीदार) : तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार शेती असून, येथील शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच नगदी पीक म्हणून झेंडूच्या फुलांकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आणि विहिरींच्या पाणीपातळीत घट झाल्याने झेंडू पिकाने शेतकऱ्यांची मोठी कसोटी पाहिली. मात्र, या प्रतिकूल हवामानातही जिद्दीने पिके जगवून शेतकऱ्यांनी सणासुदीच्या हंगामासाठी दर्जेदार फुले बाजारात आणली आहेत. शेतातून दर्जेदार फुले तोडण्यासाठी मजुरीचा दर ४०० ते ५०० रुपयांपर्यंत गेला असताना, ठोक बाजारात व्यापारी १६ रुपये किलोने खरेदी करत असल्याचे चित्र आहे. मात्र, याच फुलांना खुल्या बाजारात ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. दरातील ही तफावत पाहता, व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी स्वतः थेट स्थानिक आठवडे बाजार किंवा ग्राहकांपर्यंत पोचून विक्री केल्यास मजुरी व उत्पादन खर्चावर मात करून चांगला नफा मिळवणे शक्य असल्याचे प्रयोगशील शेतकऱ्यांचे मत आहे. चौकट कृषी मार्गदर्शनाची गरज काही भागांत करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर मर्यादा आल्या. आगामी काळात अशा रोगांचे वेळीच व्यवस्थापन करण्यासाठी आणि ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर करण्यासाठी कृषी विभागाने बांधावर जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करावे, जेणेकरून झेंडूची शेती अधिक शाश्वत व फायदेशीर ठरेल. प्रतिक्रिया यंदा पावसाची कमतरता आणि विहिरींच्या पाण्याची पातळी घटल्याने झेंडूचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक ठरले. करपा रोगामुळे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी उपलब्ध पाण्याच्या नियोजनातून आम्ही पीक वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शासनाने व कृषी विभागाने अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन, रोगांवरील उपाययोजना आणि थेट बाजारपेठेशी जोडण्यासाठी मदत केली, तर झेंडूचे पीक निश्चितच शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देईल. - ज्ञानबाराव गिते, झेंडू उत्पादक शेतकरी, सेनगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam Latest Water Level : खडकवासला धरणसाखळीत 77.80 टक्के पाणीसाठा; गतवर्षीच्या तुलनेत 5.56 टीएमसीने घट, चारही धरणांत पाण्याची आवक शून्य

Praful Patel Clarification : '10 नोव्हेंबरनंतर पुन्हा भेटणार...' शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीत काय ठरलं? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे होणार का विलीनीकरण?

Political Statement by MP Omraje Nimbalkar : "दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर..."; ठाकरेंना सोडचिठ्ठी देणाऱ्या बड्या खासदाराच्या वक्तव्याने खळबळ!

Latest Marathi News Live Update: : पालघरमधील अतिदुर्गम हट्टीपाड्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी; पांडुरंग शिंदेंच्या घरी जाऊन केले लक्ष्मीपूजन

U19 IND vs U19 PAK: रोमहर्षक सामन्यात भारताचा पराभव! हमजा जहूरच्या शतकामुळे पाकिस्तानचा विजय, आता Asia Cup सेमीफायनलसाठी समीकरण काय?

SCROLL FOR NEXT