कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत  esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे गटात पडली फूट

फुलंब्री : बलांडे गट भाजपसोबत तर ठोंबरे गट स्वतंत्र

सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री : फुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत युती आघाडीचे मागील गेल्या पंधरा दिवसापासून सातत्याने चर्चा सुरू होती. परंतु आता या चर्चेला पूर्णविराम बसला असून बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे गटात फूट पडली आहे.

माजी सभापती किशोर बलांडे यांचा गट भाजप सोबत गेला तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांचा गट स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत पाहायला मिळणार आहे.

फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले असून या बाजार समितीत आमदार हरिभाऊ बागडे, माजी आमदार डॉ.कल्याण काळे, माजी सभापती किशोर बलांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे या प्रमुख नेत्यांनी आपापली शक्ती पणाला लावली आहे. शिवसेना शिंदे गट व भाजप हे राज्यातले समीकरण फुलंब्री येथील बाजार समितीच्या निवडणुकीतही होईल अशी सर्वत्र चर्चा होती.

परंतु शिवसेना शिंदे गटातही आता फूट पडली असून जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे यांचा गट भाजपला जाऊन मिळाला तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांचा गट स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गट हे तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची वज्रमुठ बांधली आहे. त्यामुळे या निवडणुकीत आता चांगलीच रंगत दिसून येणार आहे.

फुलंब्री बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण १८ जागा असून भाजपने शिवसेना शिंदे गटाचे माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे यांच्या गटाला तीन जागा दिल्याची चर्चा आहे. तर उर्वरित जागेवर भाजप निवडणुकीला सामोरे जाणार आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी व्यापारी मतदारसंघात दोन, हमाल मापारी मतदारसंघात एक तर सोसायटी मतदारसंघात एक असे स्वतंत्र उमेदवार उभे केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटात मोठी फूट पडली असल्याची चर्चा तालुक्यात सर्वत्र सुरू आहे.

महाविकास आघाडीचे सूर मिळाले

फुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची वज्रमुठ बांधली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिंदे गट असाच सामना रंगणार असल्याचे चित्र दिसून येऊ लागले आहे. तर दुसरीकडे शिंदे गटात फूट पडल्याने पक्षातील कार्यकर्ते संभ्रमात आहे. त्यामुळे आता आगामी काळात दोन्ही शिवसेना शिंदे गटाला किती यश मिळते हे आगामी काळातच दिसून येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : चाकणमध्ये भाईगिरीचा थरार! फक्त हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसची तोडफोड

60 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या, लंडनमध्ये घर; तब्बल 'इतक्या' कोटींची आहे अजय देवगणची संपत्ती, आकडा ऐकून थक्क व्हाल

Honey Trap Case : पाकिस्तानी महिला हेराच्या जाळ्यात अडकला नौदलाचा जवान

श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू; १० ऑक्टोबरपर्यंत मिळणार नाही दर्शन! जाणून घ्या 'या' प्रथेमागील नेमकं कारण...

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुवाहाटीत तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT