Marriage eSakal
छत्रपती संभाजीनगर

Marriage : शुभमंगलसाठी इच्छुक झाले ‘सावधान’...! संपूर्ण मोसमात ८७ मुहूर्त

गणेशोत्सव, नवरात्रापाठोपाठ दसरा-दिवाळी असा सणासुदीचा काळ संपल्यानंतर आता लग्नसराईला सुरुवात होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - गणेशोत्सव, नवरात्रापाठोपाठ दसरा-दिवाळी असा सणासुदीचा काळ संपल्यानंतर आता लग्नसराईला सुरुवात होत आहे. २७ नोव्हेंबरपासून जुलैपर्यंत लग्नसराई धुमधडाक्यात सुरू असेल. यंदा अधिक महिन्यामुळे विवाह मुहूर्त पुढे गेले असले तरी संपूर्ण मोसमात ‘शुभमंगल’ करण्यासाठी ८७ मुहूर्त आहेत.

तुळशी विवाह होताच सनई-चौघडे वाजण्यास सुरुवात होते. चातुर्मास समाप्तीनंतर मुहूर्त सुरु होतात आणि पुढील वर्षीच्या आषाढ महिन्यापर्यंत म्हणजे चातुर्मास सुरू होईपर्यंत असतात. यंदा २७ नोव्हेंबरपासून मुहूर्तांना प्रारंभ होणार आहे. जुलै महिन्यापर्यंत तिथी मुबलक आहेत. सर्वाधिक म्हणजेच तब्बल १४ विवाह मुहूर्त

जुलै महिन्यात आहेत. मात्र यंदा मे महिन्यात दोनच मुहूर्त आहेत, असे दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले. ३ मे २०२४ ते ११ जून २०२४ या कालावधीत गुरु व शुक्र दोघांचाही एकत्रित अस्त असल्याने या काळात एकही मुहूर्त नाही, असे दाते यांनी स्पष्ट केले. मात्र यांमुळे मे महिन्यातील सुट्टीचा योग साधून लग्नाचा बार उडवण्याच्या अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे.

बाजारपेठेसाठी लाभदायी...

लग्नसराई म्हटल्यावर मंगल कार्यालये, केटरर्स, कपड्यांची खरेदी, डेकोरेशन या साऱ्या गोष्टी आल्याच. ‘लगीनघाई’ सुरू झाल्याने या खरेदीलाही आता वेग आला आहे. यंदा जुलै महिन्यापर्यंत मुहूर्त असल्याने व्यावसायिकांसाठी हा लग्नसराईचा मोसम ‘लाभदायक’ ठरणार आहे.

सोमवारपर्यंत तुळशी विवाह

दिवाळीनंतर वेध लागतात ते तुळशी विवाहाचे. यंदा कार्तिक शुक्ल द्वादशीपासून म्हणजे शुक्रवारपासून (ता. २४) तुळशी विवाहांना सुरुवात होणार आहे. तुळशी विवाह करण्याची परंपरा असलेल्यांनी २७ नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही दिवशी आपल्या सोयीने तुळशी विवाह करावा, असे पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.

महिना व विवाह मुहूर्त

  • नोव्हेंबर : ९

  • डिसेंबर : १०

  • जानेवारी : १२

  • फेब्रुवारी : १३

  • मार्च : ८

  • एप्रिल : १०

  • मे : २

  • जून : ९

  • जुलै : १४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT