छत्रपती संभाजीनगर

माटरगावात अवैध गोवंश कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा

CD
माटरगावमधून ४२ गोवंशाची सुटका खुलताबाद, ता. ११ (बातमीदार) : तालुक्यातील माटरगाव येथे अवैध गोवंश कत्तलीसाठी चालविण्यात येत असलेल्या ठिकाणावर खुलताबाद पोलिसांनी शुक्रवारी (ता. ११) पहाटे पाचला कारवाई केली. पोलिसांनी ४२ जिवंत तसेच पाच कापलेल्या अवस्थेतील गोवंश, यासह चार वाहने जप्त केली. एकूण ४२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चौघांना ताब्यात घेतले. माटरगाव येथील एका घरासमोर पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश कत्तलीसाठी ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील व पोलिसांच्या पथकाने पहाटे अचानक छापा टाकला. तेथून ४२ जिवंत गोवंश ताब्यात घेतले. त्यांची अंदाजे किंमत ११ लाख ७५ हजार रुपये आहे. शिवाय पाच जनावरे कापलेल्या अवस्थेत आढळली. महिंद्रा स्कॉर्पिओ, होंडा सिटी, अशोक लेलँड पिकअप आणि अल्टो कार अशा एकूण ३१ लाख रुपयांची वाहने ताब्यात घेतली. या प्रकरणात अजिम बाबू शेख (वय ३६, रा. माटरगाव), मोईन रजाक कुरेशी (वय ४५), अनिस अजिज कुरेशी आणि वाजीद अजिज कुरेशी (तिघे रा. समतानगर, छत्रपती संभाजीनगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी हवालदार नवनाथ कोल्हे यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा नोंद झाला.

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

SCROLL FOR NEXT