छत्रपती संभाजीनगर

''ती'' चा कायदा, मातृत्व रजेसंबंधी महत्त्वाच्या तरतुदी

CD
((‘ती’चा कायदा)) --- मातृत्व रजा हा उपकार नव्हे, तुमचा कायदेशीर हक्क ----- मातृत्व रजेसंबंधीची तोंड ओळख गेल्या लेखात आपण पाहिली. आता सविस्तर तरतुदी पाहूयात. मातृत्व रजेचा लाभ घेण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांनी आवश्यक असणाऱ्या तपशिलासहित महिला कर्मचारी ज्या कार्यालयात/आस्थापनेत काम करते, त्या आस्थापनेत अर्ज करावा लागतो. आवश्यक त्या अटी पूर्ण झाल्यास, मातृत्व रजेचा अर्ज मंजूर होतो. प्रसूतीनंतर कामावर परतल्यावर, स्तनदा महिला कर्मचाऱ्यांना बालकांच्या निर्धारित वयानुसार, लहान बाळांना स्तनपान करता यावे, यासाठी दिवसातून दोन वेळेस कामातून सुटी मिळू शकते. कामादरम्यान असणाऱ्या नियमित सुटीव्यतिरिक्त ही सुटी असते. ५० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असणाऱ्या आस्थापनांमध्ये पाळणाघर असणे गरजेचे असते. महिला कर्मचाऱ्यांना दिवसातून कामादरम्यान चार वेळेस पाळणा घरात जाऊन बाळाला भेटता येते. महिला कर्मचाऱ्याने मातृत्व रजा मागितली, तर ती देणं बंधनकारक असते. महिला कर्मचाऱ्यांनी मातृत्व रजा मागितल्यास आस्थापनेला कर्मचाऱ्याला फुकट वेतन द्यावे लागते. ती महिला कर्मचारी कामावर नसल्यामुळे तिचे काम दुसऱ्या कर्मचाऱ्यांना करावे लागते. अशा कारणांमुळे महिला कर्मचाऱ्यांनी मातृत्व रजा मागितल्यास, तिला बेकायदेशीररीत्या सेवेतून कमी करणे, तिला लाभ नाकारणे, यावर कायदेशीर निर्बंध आहेत. म्हणजेच, मातृत्व रजा रजेच्या काळात नोकरीत संरक्षण देते . मातृत्व रजा ही ट्युबेक्टॉमी, शस्त्रक्रियेनंतर, रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांना, बाळ दत्तक घेतले असेल, तर अशा महिलांनाही मिळू शकते. ट्युबेक्टॉमी शस्त्रक्रियेनंतर दोन आठवड्यांची रजा वेतनासह मिळू शकते. महानगरपालिकेत रोजंदारीवर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना, केवळ त्या नियमित कर्मचारी नाहीत, म्हणून मातृत्व लाभ नाकारता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात म्हटले आहे. एका प्रकरणात महिला परिचारिकेने तिच्या पहिल्या जैविक अपत्याच्या जन्मानंतर मातृत्व रजेची मागणी केली होती. परंतु, पतीच्या पहिल्या विवाहातील मुलांचा विचार करून, त्या महिलेस मातृत्व रजा नाकारण्यात आली होती. न्यायालयाने ती रजा त्या महिलेला द्यायला लावली. कारण तिचे ते पहिलेच जैविक अपत्य होते. बाळ दत्तक घेतले असेल, तरीही मातृत्व रजा मिळू शकते. दत्तक मातांना मातृत्व लाभ देण्यासाठी, बालकाचे वय तीन महिन्यांपेक्षा जास्त असेल, तर मातृत्व रजा मिळणार नाही, असे कायद्यात म्हटले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने ते अयोग्य ठरविले आणि तीन महिन्यांपेक्षा मोठे बाळ दत्तक घेतले, तरी मातृत्व रजा मिळू शकते, असा निर्णय दिला. बाळ दत्तक घेतले असेल, तर १२ आठवड्यांची मातृत्व रजा मिळू शकते. याबरोबरच आणखी एक महत्त्वाची तरतूद लक्षात घेण्यासारखी आहे. बाळाच्या जन्माचा आनंद पित्यालाही घेता यावा, पित्यालाही बाळाबरोबर वेळ घालविता यावा, यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना पंधरा दिवसांची पितृत्व रजा वेतनासहित मिळू शकते; पण खासगी आस्थापनात अजून अशी तरतूद नाही. - ॲड. गीता देशपांडे deshpandegeeta3@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा दुर्घटना! पोलिसांनी केला पंचनामा; लिफ्ट नेमकी कशामुळे कोसळली?

Petrol Diesel Tax: पेट्रोल-डिझेलबाबत सरकारचा मोठा निर्णय! 31 ऑक्टोबरपासून डिझेलवरील टॅक्स वाढवला; पेट्रोल-डिझेल आता कितीला?

Nagpur News : डीसीपी रेड्डी, डॉ. ठाकरे यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक; निरीक्षक प्रभावती एकुरके, रितेश अहेर यांचाही गौरव

IND A vs NZ A, 2nd Test: पहिल्या मॅचमध्ये फ्लॉप, पण दुसऱ्या मॅचमध्ये थेट नाबाद ९९! ध्रुव जुरेलने पडिक्कलसह सावरला भारताचा डाव

Marathi News Live Updates : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचा 'जनमहाभियोग'; दिल्लीत भरवली मॉक पार्लमेंट, राहुल गांधींचे असणार अंतिम भाषण

SCROLL FOR NEXT