छत्रपती संभाजीनगर

क्रीडा मैदान गाजवले; मत्स्योदरीच्या खेळाडूंची चमक

CD
क्रीडा मैदान गाजवले; मत्स्योदरीच्या खेळाडूंची चमक तीर्थपुरी, ता.४ : सावित्रीबाई फुले विद्यालय, बोंधलापुरी येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत तीर्थपुरी येथील मत्स्योदरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत यश संपादन केले. धावणे व रिले : १०० मीटरमध्ये मुक्ता माळोदे हिने प्रथम, देवयानी सावंत हिने द्वितीय क्रमांक मिळविला. २०० मीटरमध्ये राधिका मोहाळे प्रथम, अंजली आरबड द्वितीय आली. ४०० मीटरमध्ये दीप्ती काळे प्रथम, कल्याणी बेडके द्वितीय ठरली. ६०० मीटरमध्ये गायत्री भोसले हिने प्रथम क्रमांक मिळविला. ८०० मीटरमध्ये सारिका नाईकवाडे प्रथम, कीर्ती उढाण द्वितीय आली. १५०० मीटरमध्ये प्रथमेश गरड प्रथम, वैष्णवी गंगाधर वाघमारे द्वितीय आली. ३००० मीटरमध्ये साक्षष जुगधर प्रथम, वैष्णवी नाईक व महेश जुगधर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. गोळाफेकमध्ये उत्कर्षा खोटे प्रथम, कोमल शिंदे द्वितीय, कल्याणी भालेराव व अभिनंदन गरड यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. थाळीफेकमध्ये पूजा आव्हाड, कोमल कृष्णा आव्हाड व ओम फुलांरे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. मोहिनी शिंदे व अभिमन्यू गरड यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. भालाफेकमध्ये अभिमन्यू गरड प्रथम, शिवराज चिमणे द्वितीय आला. हातोडाफेकमध्ये पार्थ डांगे प्रथम, ओम फुलांरे द्वितीय आला. तिहेरी उडीत कल्याणी बेडके हिने प्रथम, उंच उडीत अभिजित घुले याने द्वितीय, तर लांब उडीत सागर बर्डे प्रथम व श्रावणी कातकडे हिने द्वितीय क्रमांक मिळविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESIC New Rules 2026 : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजारपण आणि प्रसूती लाभांसाठी अर्जाची गरज नाही; पैसे थेट बँक खात्यात जमा होणार

Gadchiroli History: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात इतिहासाचा खजिना! १६व्या-१७व्या शतकातील ५० वीरगळांचा शोध, शूरवीरांच्या पराक्रमाची शिल्पे उजेडात

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी नेमकं काय घडलं? होत, मॅच रेफ्रींच्या चुकीमुळे वाद, पाकिस्तानी चाहत्यांनी केले आरोप

Water Security 2051 : पुणे महानगर प्रदेशाच्या पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन; जलसंपदा विभागाचा २०५१ पर्यंतचा जलसुरक्षा आराखडा तयार होणार

Palodwadi Robbery: पालोदवाडीत चार चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरांवर दरोडा, महिलांच्या गळ्याला चाकू लावून ३.३२ लाखांचा ऐवज लुटला

SCROLL FOR NEXT