छत्रपती संभाजीनगर

फोकस - वैद्यकीय जागा वाढल्या; पण तज्ज्ञ प्राध्यापक कुठे आहेत?

CD
(((फोकस))) --- ABD26J81976 (((ओव्हरसेट))) -- वैद्यकीय जागा वाढल्या; पण तज्ज्ञ प्राध्यापक कुठे आहेत? --- प्रताप अवचार ८३२९३९०८३४ --------------- देशभरात सध्या जिल्हा स्तरावर नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यावर आणि खासगी विद्यापीठांमध्ये एमबीबीएसच्या जागा वाढवण्यावर मोठा भर दिला जात आहे. या निर्णयामुळे दरवर्षी हजारो नवीन विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी मिळत आहे, ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र, वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या आणि विद्यार्थ्यांचे प्रमाण ज्या वेगाने वाढले, त्या तुलनेत वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या तज्ज्ञ प्राध्यापकांची भरती झाली आहे का? हा अत्यंत गंभीर प्रश्न आज निर्माण झाला आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर आधीचे ३६ वैद्यकीय महाविद्यालये असताना नव्याने स्थापन झालेल्या १० शासकीय महाविद्यालयांमुळे एमबीबीएसच्या एक हजारांहून अधिक नवीन जागा यंदा वाढल्या आहेत. नव्याने निर्माण झालेली महाविद्यालये प्रामुख्याने अमरावती, बुलडाणा, वाशीम, जालना, हिंगोली, भंडारा, गडचिरोली, अंबरनाथ (ठाणे), मुंबई, नाशिक तसेच ईएसआयसी मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल (अंधेरी) येथील आहेत. एकीकडे या वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढल्याने विद्यार्थी हिताचे आहे. परंतु, सध्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडून तज्ज्ञ प्राध्यापक भरती या मूलभूत गरजेकडे पुरेसे लक्ष नसल्याचे चित्र आहे. नव्या महाविद्यालयांचे नॅशनल मेडिकल कमिशनचे निकष पूर्ण करण्यासाठी आणि तपासण्या पार पाडण्यासाठी नामांकित जुन्या महाविद्यालयांतील अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची तात्पुरती बदली केली जाते किंवा त्यांच्यावर अतिरिक्त भार सोपवला जातो. यामुळे मूळ महाविद्यालयातील अध्यापनावर आणि रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होत आहे. अनेक प्राध्यापकांवर अध्यापनासोबतच प्रशासकीय आणि वैद्यकीय सेवेचा अतिरिक्त ताण असल्याने, ते विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. वैद्यकीय शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसते; त्याला प्रत्यक्ष रुग्ण हाताळणी आणि तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचीही अधिक जोड आवश्यक असते. जर महाविद्यालयांमध्ये पुरेशा संख्येने आणि उच्च दर्जाचे प्राध्यापकच नसतील, तर तिथून बाहेर पडणारी भावी डॉक्टरांची पिढी कितपत सक्षम आणि जबाबदार असेल, हा मोठा प्रश्न आहे. शासनाने केवळ एमबीबीएसच्या जागा वाढवल्या असा कागदोपत्री विकास न दाखवता, तातडीने तज्ज्ञ प्राध्यापकांची कायमस्वरूपी भरती प्रक्रिया राबवली पाहिजे. नवीन जागांच्या प्रमाणातच प्राध्यापकांची पदे मंजूर करून ती भरणे अनिवार्य आहे; अन्यथा दर्जाहीन वैद्यकीय शिक्षणामुळे उद्याच्या आरोग्य व्यवस्थेचा पाया कमकुवत होईल. शेवटी हे वैद्यकीय शिक्षण सामान्य व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळेत जागे होऊन या समस्येवर ठोस उपाययोजना करावी, हीच काळाची गरज असणार आहे.

Gold Jewellery Price: लग्नासाठी सोनं आत्ताच खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी? सोन्याचा भाव 1 लाखांपर्यंत येणार?

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्याच्या कोरंभी बायपासवर भीषण अपघात; वाहतूक पोलिसाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT