छत्रपती संभाजीनगर

मानसिक आरोग्य सप्ताहात ३०० विद्यार्थी सहभागी

CD
मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी ‘मेंटल हेल्थ वीक’ ----- पडेगाव, ता. ५ : मानसिक आरोग्याबाबत जनजागृती तसेच मानसिक आजारांविषयीचा सामाजिक कलंक दूर करण्यासाठी डॉ. ए. ए. कादरी यांच्या मेंटल हेल्थ सेंटरतर्फे सोमवार ते शनिवार (ता. ५ ते १०) मेंटल हेल्थ वीक- २०२६ आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विविध स्पर्धांसाठी आतापर्यंत ३०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती पत्रकार परिषदेत डॉ. कादरी यांनी दिली. सप्ताहात सोमवारी वादविवाद, मंगळवारी पोस्टर मेकिंग, बुधवारी नाट्य व स्किट, गुरुवारी वक्तृत्व आणि शुक्रवारी रील स्पर्धा होणार आहे. मानसिक आरोग्य, भावनिक स्वास्थ्य, नातेसंबंध, सामाजिक जबाबदारी आणि मानसिक आजारांविषयी विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी या स्पर्धांमधून व्यासपीठ मिळणार आहे. शनिवारी (ता. १०) जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त प्रसिद्ध कथाकथनकार व स्टोरी आर्कियोलॉजिस्ट लक्ष माहेश्वरी यांचा खुशियाँ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. आनंद, नातेसंबंध, जीवनातील अनुभव, आत्मचिंतन आणि मानसिक स्वास्थ्य या विषयांवर कथाकथनातून भाष्य केले जाणार आहे. याच कार्यक्रमात विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. इंडिव्हिज्युअल ॲज द वर्कप्लेस या संकल्पनेतून मानसिक आरोग्य हा प्रत्येकाचा विषय असल्याचा संदेश दिला जाणार आहे.

PNEUMONIC PLAGUE: रशियातील लॅबमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा मृत्यू; नक्की काय आहे 'न्यूमोनिक प्लेग'? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

Dearness Allowance Hike: कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! व्हेरिएबल डीए वाढला; नेमका किती आणि कोणाला फायदा होणार?

२ केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट होणार, मोदी कॅबिनेटमध्ये फेरबदलाच्या चर्चांना उधाण; ५ जागा रिक्त, आप-शिवसेनेला संधी?

Australia A विरुद्ध सुरु होणार ODI मालिका! हार्दिक, नमनची माघार; तरीही भारताची तगडी फौज मैदानात; जाणून घ्या डिटेल्स

Pune News : मनोज जरांगे यांना प्रश्‍न विचारल्‍याने ट्रोलधाड; रेखा कोंडे यांचा जरांगेंवर आरोप, टेंडर प्रक्रियेवरून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT