छत्रपती संभाजीनगर

एमजीएमच्या माजी विद्यार्थ्यांच्या मदतीतून ‘आशीर्वादाची दिवाळी''

CD
एमजीएमच्या माजी विद्यार्थ्यांच्या मदतीतून ‘आशीर्वादाची दिवाळी'' छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी आणि मित्रपरिवाराने सामाजिक बांधिलकी जपत विशेष उपक्रम राबविला. या उपक्रमातून एकूण १ लाख ५७ हजार ८१३ रुपयांचा निधी संकलित करण्यात आला. या निधीतून बीड जिल्ह्यातील ५० गरजू शेतकरी कुटुंबांना किराणा साहित्य, गोशाळेतील जनावरांना चारा व पाण्याची व्यवस्था, अनाथ मुलांसाठी मदत तसेच वृद्धाश्रमासाठी जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या. राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.डॉ. रवींद्र देशमुख यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. आसरडोह (ता. धारूर, जि. बीड) येथील सामाजिक कार्यकर्ते रविकिरण देशमुख यांनी तेथील परिस्थितीची माहिती देत मदतीचे आवाहन केले. त्यानंतर प्रा.डॉ. देशमुख यांनी समाजमाध्यमे आणि वैयक्तिक संपर्कातून केलेल्या आवाहनाला अवघ्या आठ ते दहा तासांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि दीड लाखांहून अधिक निधी जमा झाला. यातून आसरडोह येथील ५० गरजू शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपये किमतीचे किराणा साहित्य देण्यात आले. यासाठी एक लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. अंबाजोगाई येथील पावनी गोशाळेला ३० हजार रुपयांची मदत देण्यात आली. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील भगवानबाबा बालिकाश्रमातील अनाथ मुला-मुलींसाठी २५ हजारांचे किराणा साहित्य उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय मलेशिया येथे स्थायिक असलेले एमजीएमचे माजी विद्यार्थी गिरीश कुलकर्णी यांनी स्वतःहून तेल, तांदूळ आणि पीठ असे जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. हे साहित्य मातोश्री वृद्धाश्रमात वितरित करण्यात येणार आहे. मनीष जाजू यांनी पाच हजार रुपयांची मदत देण्याची तयारी दर्शविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Lit Fest: सकाळ लिट फेस्ट 2026चा पुण्यात दिमाखदार प्रारंभ; बानू मुश्ताक, डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते उद्घाटन

Unknown UTI Symptoms: लघवी करताना जळजळ होत नाही, तरीही असू शकते UTI! शरीरातील 'हे' ६ बदल वेळीच ओळखा

Latest Marathi News Live Update : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण शक्य नाही; सतेज पाटलांची सडेतोड भूमिका

Dwayne Johnson Health : 'द रॉक'ला गंभीर आजार झाल्याची चर्चा? २२ किलो वजन घटल्यानंतर व्हायरल दाव्यामागचे खरे सत्य समोर!

Social Media: एका ओळीची पोस्ट अन् थेट PM मोदींचा रिप्लाय; हा नेटकरी आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT