आविष्कार संशोधन स्पर्धेत एमजीएमच्या विद्यार्थ्यांची बाजी
नांदेड, ता. ६ : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत महात्मा गांधी मिशनच्या कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आयटी, नांदेड येथील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी एक प्रथम आणि दोन द्वितीय अशी एकूण तीन पारितोषिके पटकावली.
स्पर्धेत एस.वाय. बीसीए वर्गातील रुज्वी साबळे हिने ‘टाल्कइज : भारतीय सांकेतिक भाषा अनुवाद प्रणाली’ या संशोधन प्रकल्पासाठी प्रथम पारितोषिक मिळविले. एस.वाय. एम.एस्सी. (एसई) वर्गातील जयदेव देवरे याने ‘एड्यू असेस : सस्टेनेबल स्मार्ट ऑनलाइन एक्झाम पोर्टल’ या प्रकल्पासाठी द्वितीय पारितोषिक पटकावले. तर टी.वाय. बीटी वर्गातील श्रीनिवास वाघमारे याने ‘फायटो क्युब टिश्यू कल्चर चेंबर’ या संशोधन प्रकल्पासाठी द्वितीय पारितोषिक मिळविले. संशोधन प्रकल्पांना प्रा. एम.डी. मुक्तार, प्रा. संतोष शिंदे आणि डॉ. नीता मुंदडा यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. एम.डी. मुक्तार आणि प्रा. संतोष शिंदे यांनी स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पाहिले. विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, संचालिका डॉ. गीता लाठकर, प्राचार्य डॉ. शिरीष कोटगिरे, उपप्राचार्या डॉ. कांचन नांदेडकर, डॉ. स्मिता भोपी, बायोइन्फॉर्मेटिक्स विभागप्रमुख मकरंद चेरेकर यांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.