छत्रपती संभाजीनगर

एमजीएम एसओईटीचा तांत्रिक महोत्सव उत्साहात

CD
ABD26J78761 एमजीएम एसओईटीचा तांत्रिक महोत्सवात सहभागी विद्यार्थी, मान्यवर. - एमजीएम ‘एसओईटी’चा तांत्रिक महोत्सव उत्साहात - छत्रपती संभाजीनगर, ता. ६ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजीतर्फे घेण्यात आलेला ‘सुपरनोव्हा : स्पार्क द फ्युचर २.०’ हा दोनदिवसीय तांत्रिक महोत्सव उत्साहात झाला. समारोप समारंभात स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कुलपती अंकुशराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव झाला. यात राज्यभरातील विविध विद्यापीठे, अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ‘सुपरनोव्हा : स्पार्क द फ्युचर’ या तांत्रिक महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून यंदा महोत्सवाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांमधील तांत्रिक कौशल्य, नवकल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव घेण्यात आला. यात स्टेलर, प्रोटोनोव्हा, कॉस्मोबोल्ट, स्पार्क्स, कोडबर्स्ट, ज्युनियर शार्क्स, निंजा कोडर्स, इन्फिनिटी लॅब आणि बॅटलक्लिप्स अशा नऊ विविध स्पर्धा झाल्या. बागला ग्रुपचे अध्यक्ष ऋषिकुमार बागला, टोयोटा त्सुशो इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक श्रीकांत पात्रा, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, संचालिका प्रो. डॉ. परमिंदर कौर धिंग्रा आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करून नवकल्पनांच्या माध्यमातून समाजातील विविध समस्यांवर उपाय शोधण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangare Patil Kunbi Certificate : विश्वास नांगरे -पाटील यांनी कुणबी दाखल्याचा वापर केला? अंतरवालीत ओबीसी आंदोलनात दावा; वातावरण तापलं

९ वर्षांच्या एकटेपणानंतर अपूर्वा नेमळेकरांनी सांगितली मनातली गोष्ट; दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना म्हणाली...

Yoga For Everyone: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांसाठी 'ही' आहेत सर्वोत्तम योगासने! आरोग्य अन् मानसिक शांतीची पक्की गॅरंटी...

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

SCROLL FOR NEXT