छत्रपती संभाजीनगर

मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी

CD
पदवीधर निवडणुकीत सूक्ष्म निरीक्षकांनी दक्ष राहावे ----- परभणी, ता. १३ : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सूक्ष्म निरीक्षकांनी आपली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी. मतदान केंद्रावरील प्रत्येक घडामोडीचे बारकाईने निरीक्षण करून निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांचे पहिले प्रशिक्षण सोमवारी (ता. १२) जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले आणि शैलेश लाहोटी उपस्थित होते. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका, जबाबदाऱ्या, निवडणूक प्रक्रियेतील बारकावे आणि मतदानाच्या वेळी घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगेवार यांनी निवडणूक प्रक्रियेतील तांत्रिक बाबी, विहित कार्यपद्धती आणि मतदान प्रक्रियेच्या निरीक्षणादरम्यान करावयाच्या कार्यवाहीची माहिती दिली. दरम्यान, प्रशिक्षणास अनुपस्थित राहिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. संबंधितांचा खुलासा असमाधानकारक आढळल्यास नियमानुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला. निवडणुकीसाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला उपस्थित राहून सोपविलेल्या जबाबदाऱ्या गांभीर्याने पार पाडाव्यात, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Rally: शेअर बाजारात तुफान तेजी! गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स १,१०९ अंकांनी वधारला

Pregnant journalist allegation: गर्भवती महिला पत्रकाराला राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप; 'एक्स-रे'वरून काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न

Latest Marathi News Live Update: ज्ञानेश कुमार हे माफिया आहेत- संजय राऊत

WTC Points Table: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताच्या WTC Final खेळण्याच्या स्वप्नाचा चुराडा? जाणून घ्या समीकरण

Pune News : गंभीर आजारी वडिलांचे पालकत्व मुलीकडे; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, ‘पेरेन्स पॅट्रिए’ तत्त्वाचा आधार

SCROLL FOR NEXT