छत्रपती संभाजीनगर

भूखंड वाटप रद्द करण्याच्या आदेशाला उखंडपीठाचे स्थगिती

CD
एमआयडीसीच्या भूखंड वाटप रद्द करण्याच्या आदेशाला खंडपीठाची स्थगिती -------- सुपा-पारनेर औद्योगिक क्षेत्रातील प्रकरण -------- छत्रपती संभाजीनगर, ता. २९ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) सुपा-पारनेर औद्योगिक क्षेत्रातील भूखंडाचे वाटप रद्द करून त्याचा ताबा परत घेण्याच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. भूखंडधारक कमलेश जैन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा अंतरिम आदेश दिला. तसेच, याचिकाकर्त्याविरुद्ध अन्यायकारक कारवाई करू नये, असे निर्देशही दिले. सुपा-पारनेर औद्योगिक क्षेत्रातील भूखंडाचे वाटप रद्द करण्याचा आदेश अहिल्यानगर येथील एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी दिला होता. या आदेशाला आव्हान देत कमलेश जैन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, संबंधित भूखंडाचे वाटप होण्यापूर्वीपासूनच त्यावर अतिक्रमण होते. हे अतिक्रमण हटवून भूखंडाचा मोकळा ताबा द्यावा, अशी मागणी त्यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार केली होती. मात्र, त्यावर आवश्यक कार्यवाही झाली नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला. भूखंडावरील अतिक्रमणामुळे निर्धारित कालावधीत बांधकाम करणे आणि भूखंड विकसित करणे शक्य झाले नाही. त्यामुळे उद्योग सुरू करण्याच्या प्रयत्नांत अडथळे निर्माण झाले. त्यातच कोरोना महामारीमुळे उद्योजकांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या, असे याचिकाकर्त्याच्या वतीने मांडण्यात आले. न्या. नितीन बी. सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब डी. शिंदे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली. न्यायालयाने एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भूखंड वाटप रद्द करण्याबाबत दिलेल्या आदेशाला स्थगिती देत याचिकाकर्त्याला अंतरिम दिलासा दिला. या प्रकरणात याचिकाकर्ते कमलेश जैन यांच्या वतीने ॲड. विजय लटंगे यांनी काम पाहिले. एमआयडीसीच्या वतीने ॲड. एस.एस. दंडे, तर शासनाच्या वतीने ॲड. एम.के. गोयंका यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : 'गोकुळ'च्या अध्यक्षपदी चुयेकर, समांतर सभेत मोठी घोषणा; सतेज पाटलांचा मास्टरस्ट्रोक, आता महायुतीच्या भूमिकेकडे लक्ष

SIP Investment: फक्त 3,500 रुपयांच्या SIP मधून 3 कोटींचा फंड! करोडपती बनण्याचा फॉर्म्युला कसा काम करतो? गणित पाहा!

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Meenakshi Shinde Resign: माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत..., मीनाक्षी शिंदेंनी राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

WPL AUCTION 2027: वय फक्त १५ वर्षे, WPL ऑक्शनमध्ये इतिहास! दिल्ली कॅपिटल्सने उमा काशवीला निवडलं, कोण आहे ही युवा अष्टपैलू खेळाडू?

SCROLL FOR NEXT