छत्रपती संभाजीनगर

पालकमंत्र्यांच्या बंगल्यावरील प्रकाराने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

CD
लेट नाइट न्यूज ------------- ABD26J83064 गोलवाडी ः पालकमंत्री संजय शिरसाट यांचा बंगला. -- पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न --- छत्रपती संभाजीनगर, ता. १३ : पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडी येथील निवासस्थानाच्या परिसरात मध्यरात्री मद्यधुंद तरुणांनी गोंधळ घातला. सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की करीत बंगल्याच्या दिशेने हल्ल्याचा प्रकार घडला. गुरुवारी (ता. १२) रात्री अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेत एका पोलिस कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली. सातारा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. दरम्यान, घटनेनंतर पालकमंत्री शिरसाट यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून पोलिस यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली. गोलवाडी येथील पालकमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या मागील बाजूस काही तरुण मद्यपान करीत असल्याचे बंदोबस्तावरील पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना हटकून तेथून जाण्यास सांगितले. यावरून तरुणांनी पोलिसांशी वाद घातला. त्यानंतर बाटल्या फोडून काही बाटल्या बंगल्याच्या दिशेने भिरकावल्या. सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता झटापट झाली. यामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पालकमंत्री शिरसाट यांनी या घटनेबाबत माध्यमांशी बोलताना पोलिसांच्या प्रतिसादावर प्रश्न उपस्थित केले. तीन युवक रात्री साडेदहा ते पावणेअकराच्या दरम्यान माझ्या बंगल्यासमोर आले. ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसत होते. त्यांनी बाटल्या फोडल्या. सुरक्षारक्षकांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, माझ्या खिशात अनेक ओएसडी आहेत, अशा प्रकारची भाषा केली, असे त्यांनी सांगितले. या घटनेपेक्षा पोलिस यंत्रणेच्या प्रतिसादाचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे सांगत त्यांनी पोलिस आयुक्तांचा फोन बंद होता, तसेच एकही डीसीपी किंवा एससीपी घटनास्थळी आले नसल्याचा आरोप केला. महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांना रात्री बाराच्या सुमारास फोन केला असता त्यांनी प्रतिसाद देत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे शिरसाट यांनी सांगितले. माझी अशी परिस्थिती असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? शहरात गेल्या काही दिवसांत दिवसा ढवळ्या खून होत आहेत, अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, पोलिस आयुक्तांना याचे गांभीर्य दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, या प्रकरणी सातारा पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhosari Purandar Airport : भोसरीतून थेट पुरंदर विमानतळापर्यंत भुयारी मार्गाची योजना; ‘पाताळ लोक’ प्रकल्पासाठी पुणे महापालिकेने उचलले पुढचे पाऊल

Kimberly Powell: कोण आहेत एनव्हिडियाच्या सीईओची 'विकेट' घेणाऱ्या किंबर्ली पॉवेल? इंटर्न ते थेट कंपनीच्या उपाध्यक्षा

Nvidia CEO Exit: ३३ वर्षांच्या प्रवासाला २ अफेअर्समुळे 'ब्रेक'! जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओचा तडकाफडकी राजीनामा; एआय जगताला हादरा

Khopoli Bus Accident : बाजारपेठेत अर्धा किलोमीटर मृत्यूचा थरार! अनियंत्रित बसने अनेक वाहनांना उडवले; एका तरुणाचा करुण अंत!

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT