छत्रपती संभाजीनगर

मध्यरात्री रस्त्यावर फटाके फोडून वाढदिवस साजरा करणे भोवले

CD
फटाके फोडून वाढदिवस साजरा करणे भोवले मध्यरात्रीचा रस्त्यावरील प्रकार, ५ जणांवर गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर, ता. ७ : सार्वजनिक ठिकाणी मध्यरात्री फटाके फोडून शांततेचा भंग करणाऱ्या हुल्लडबाजांविरोधात क्रांती चौक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. वाढदिवसाच्या नावाखाली गर्दी जमवून मध्यरात्री फटाके फोडल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबरला मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मिल कॉर्नर सिग्नलच्या मागे, जिल्हा परिषद शाळेजवळ काही तरुण मोठ्या संख्येने एकत्र जमून फटाके फोडत असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. या माहितीच्या आधारे क्रांती चौक पोलिसांच्या गस्तीवरील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी सुमारे १५ ते २० तरुण एकत्र जमून सार्वजनिक रस्त्यावर फटाके फोडताना आढळून आले. पोलिसांनी विचारपूस केली असता, वाढदिवस साजरा करण्यासाठी ते एकत्र जमल्याचे समोर आले. या प्रकारामुळे मध्यरात्री सार्वजनिक शांततेचा भंग होऊन ध्वनिप्रदूषण होत असल्याने पोलिसांनी संबंधितांविरुद्ध कारवाई केली. याप्रकरणी बंटी ऊर्फ ओंकार साहेबराव जोगदंड, सुकेश भास्कर दांडेकर, आदित्य दसपुते, प्रवीण कवडे पाटील आणि वेदांत पाटील यांच्यासह इतर संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. नागरिकांनी रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करू नये, फटाके फोडू नयेत अथवा ध्वनिप्रदूषण टाळावे; अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा क्रांती चौक पोलिस ठाण्यामार्फत देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT