Imtiyaz Jaleel on Uddhav Thackeray
Imtiyaz Jaleel on Uddhav Thackeray Sakal
छत्रपती संभाजीनगर

उद्धव ठाकरेंनी तारीख जाहीर केल्यास फुलांची उधळन करणार : जलील

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची येत्या 8 जून रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा पार पडणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारीदेखील शिवेसेनेकडून केली जात आहे. मात्र, सभेपूर्वी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jallil) यांनी शहरातील पाणी प्रश्नावरून हल्लाबोल केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद शहराला पाणी कधी मिळणार याची नेमकी तारीख जाहीर केली तर ते ज्या मार्गाने जाणार आहेत. त्या मार्गावर फुलांची उधळण आम्ही करू, असे विधान केले आहे. औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न गंभीर असून येथील नागरिकांची हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन दिशाभूल करणं कठीण असल्याचेही इम्तियाज जलील म्हणाले. (Imtiyaz Jaleel On CM Uddhav Thackeray)

जलील म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद शहरात येऊन जाहीर सभा घेतील, परंतु ते शहराला आणि येथील नागरिकांना पाणी देऊ शकणार नाही. सध्या शहरात दहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना नियमितपणे नेमकं कधी पाणी पुरवठा करणार याची तारीख जाहीर केल्यास ते ज्या मार्गाने जाणार आहेत. त्या मार्गावर फुलांची उधळन करू. यावेळी जलील यांनी शिवसेने नेते चंद्रकांत खैरे (Chadrakant Khaire) यांनी केलेल्या आरोपांना उत्तरं दिले.

निवडणुकीत शिवसेनेची मतं खाण्यासाठी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला भाजपाने एक हजार कोटी रुपये दिले होते, असा आरोप खैरे यांनी केला होता. त्यावर आम्हाला एक हजार नाही, तर दहा हजार कोटी रुपये देण्यात आले होते. तसेच हे पैसे स्वत: चंद्रकांत खैरे यांनी आणून दिल्याचे जलील यांनी यावेळी सांगितले. एवढेच नव्हे तर, त्या पैशांमध्ये 500 रुपयांच्या चार नोटा कमी होत्या असे सांगत खैरेंनी त्या चहा पाण्यासाठी ठेवून घेतल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

Aditya Thackeray: लोकसभेनंतर शरद पवार भाजपसोबत जातील का? विश्वासार्हतेबद्दल आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली

SCROLL FOR NEXT