छत्रपती संभाजीनगर

"महाराष्ट्राचा मुस्लीम हातात तिरंगा घेऊ शकत नाही का?"

ओमकार वाबळे

एमआयएमच्या वतीने राज्यात तिरंगा यात्रा काढायला सुरुवात झाली आहे. मुस्लीम समाजाचं आरक्षण आणि वक्फ बोर्डाची जमीन लाटल्याप्रकरणी एमआयएमने या यात्रेचं आयोजन केलं आहे. इम्तियाझ जलील यांच्या पुढाकाराने ही यात्रा मुंबईकडे रवाना झाली. मात्र, पोलिसांनी दबाव आणून AIMIMची यात्रा थांबण्याचा प्रयत्न केला.

सभेसाठी मैदानं बूक करण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेना आणि सत्ताधाऱ्यांनी आमच्यावर निर्बंध आणले. धमक्या देत आमचे कार्यक्रम रद्द केले, असा आरोप खासदार इम्तियाझ जलील यांनी केला आहे. महाराष्ट्रातील मुस्लीम व्यक्ती हातात तिरंगा घेऊ शकत नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मागील महिन्यात एमआयएमचे प्रमुख असदुद्दिन ओवैसी यांचा महाराष्ट्रात दौरा होता. यावेळी त्यांना विविध ठिकाणी सभांना परवानगी नाकारण्यात आली होती. मुंबईत सभा घेण्यचा त्यांचा मानस होता. मात्र, पोलीस प्रशासनाने नकार दिला.

शेवटी ओवैसी यांना सोलापुरातील एका हॉलमध्ये सभा घ्यावी लागली. अखेर चांदिवली या ठिकाणच्या शाळेतील सभेला एमआयएमला परवानगी देण्यात आली आहे.

मुस्लीम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीचे रक्षण करण्याच्या उद्देशासाठी एमआयएमने आज तिरंगा रॅली काढलीय. राज्यातल्या सर्वच विभागातून ही तिरंगा रॅली मुंबईकडे निघाली आहे. आज सकाळी औरंगाबाद शहरातून सात वाजता एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली ही तिरंगा रॅली निघाली. तिरंगा रॅलीला औरंगाबाद शहरात आणि ग्रामीण भागात कुठेही पोलिसांनी अडवले नाही.

मात्र नगर जिल्ह्यात प्रवेश करताना नगर जिल्हा पोलीस आणि रॅलीला काही काळ अडवून ठेवले होते. वाहतुकीला आम्ही कोणताही अडथळा निर्माण करणार नाही अशी ग्वाही इम्तियाज जलील यांनी दिल्यानंतर नगर पोलिसांनी बॅरिकेड्स हटवले. त्यानंतरही रॅली मुंबईकडे रवाना झाली आहे. त्यापूर्वी नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरी नदी पुलावर मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. ही रॅली नगर चाकण मार्गे मुंबई पुणे एक्सप्रेस-वे ने मुंबईला जाणार आहे. सायंकाळी चांदीवली येथे सभा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Students Protest : 'विरोधकांना संधी मिळाली की, ते वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न करतात'; जंतरमंतर आंदोलनावरुन छगन भुजबळ यांची टीका

Aurangabad Crime: छत्रपती संभाजीनगर हादरले! ९ वर्षांच्या मुलीचे रिक्षातून अपहरण, थरारक पाठलाग, रिक्षा नाल्यात फसली अन् काय घडलं..

Latest Marathi Update : 'नीट' आणि पेपरफुटीवर संसदेत सविस्तर चर्चा हवी; विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत : शिवराज सिंह चौहान

Mumbai Local Train: लोकलमधील गर्दी संपणार, दर २ मिनिटांनी ट्रेन धावणार; रेल्वे प्रशासनाचा नवा प्लॅन

Arijit Singh Student Protest : 'माझी गाणी डिलीट करा, माझं अस्तित्व विसरा, पण स्टुडंट प्रोटेस्टला माझा पाठींबा राहणार! अरिजीत सिंहचे वक्तव्य व्हायरल

SCROLL FOR NEXT