Imtiyaz-Jaleel sakal
छत्रपती संभाजीनगर

एमआयएमचे आज उपरोधिक आंदोलन

पृष्पवृष्टी, फलक व तुतारीने वाजवून करणार स्वागत

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी शुक्रवार (ता.१७) रोजी एमआयएमतर्फे चिकलठाणा विमानतळ ते सिद्धार्थ उद्यानापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर पृष्पवृष्टी करून, तुतारी वाजवून हातात उपरोधिक फलक घेऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले जाणार आहे. या उपरोधिक आंदोलनासाठी गुरुवार (ता.१६) रोजी खासदार इम्तियाज जलील यांनी बुढीलाईन येथील कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन, गणेशोत्सव, पैठण येथील संतपीठ व इतर विकासकामांच्या उद्‍घाटनासाठी मुख्यमंत्री शुक्रवारी औरंगाबादेत येत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठवाड्याकडे सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्यामुळे मराठवाड्याचा विकास खुंटला आहे. त्यातल्या त्यात मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचे सर्वांत मोठे नुकसान आतापर्यंत राजकीय नेत्यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे मंत्री नेहमीच औरंगाबाद शहरावर शिवसेनेचे प्रेम असल्याचे सांगतात. परंतु शहरातील मूलभूत प्रश्न सोडविण्यात शिवसेनेच्या १४ महापौरांना तसेच आतापर्यंत आमदार, खासदार असलेल्या नेत्यांना अपयश आले. त्यामुळे चिकलठाणा विमानतळापासून ते सिद्धार्थ उद्यानापर्यंत मानवी साखळी उभारून मुख्यमंत्र्यांचे तुतारी वाजवून, पुष्पवृष्टीने जंगी पण उपरोधिक स्वागत करून आभार व्यक्त करणार केले जाणार आहे. बैठकीप्रसंगी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर, शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी, माजी नगरसेवक नासेर सिद्दिकी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina Statement : बांगलादेशात हिंदू तरूणाच्या निर्घृण हत्येच्या घटनेवर शेख हसीना म्हणाल्या, ‘’हे तेच लोक आहेत का?, ज्यांना...’’

Crypto Market Update: बिटकॉइन 89,000 डॉलरच्या वर! 2026 मध्ये क्रिप्टोमध्ये तेजी की घसरण? क्रिप्टोकरन्सी डॉलरची जागा घेईल का?

Pan - Aadhaar Linking : फ्रीमध्ये घरबसल्या आधारला पॅनकार्ड कसे लिंक करायचे? हे लगेच पाहा एका क्लिकवर, शेवटची तारीख 31 डिसेंबर

Latest Marathi News Live Update : घरात बसून फेसबुक लाईव्ह करून पक्ष वाढत नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Santosh Deshmukh Case: ''ते' व्हिडीओ पुन्हा-पुन्हा बघण्यासाठी आरोपींचा अट्टहास'', धनंजय देशमुखांनी उघड केली धक्कादायक बाब

SCROLL FOR NEXT