औरंगाबाद : मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीचे संरक्षण व्हावे यासह इतर मागण्यांसाठी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात शनिवारी (ता.११) सकाळी सातच्या सुमारास आमखास मैदानावरून औरंगाबाद-मुंबई तिरंगा रॅली मुंबईकडे रवाना झाली. दरम्यान, रॅलीला परवानगी नसल्याचे सांगत नगर सीमेवर पोलिसांनी ही रॅली अडविली होती. यावेळी एमआयएम कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.
मुस्लिम आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न आणि वक्फ बोर्डाच्या जमिनींचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वात मुंबईत सभा आयोजित केली आहे. त्यासाठी शनिवारी सकाळीच औरंगाबादहून इम्तियाज यांच्या नेतृत्वात औरंगाबादहून तिरंगा रॅली मुंबईच्या दिशेने रवाना होत सायंकाळी पाचला ही तिरंगा रॅली मुंबईच्या वेशीवर धडकली.
इम्तियाज आणि पोलिसांत शाब्दिक वाद
नगरच्या सीमेवर धडकल्यानंतर पोलिसांनी रॅली अडवली. तेव्हा खासदार इम्तियाज आणि पोलिसांमध्ये वाद झाला. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत रस्त्यावर गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान कुणालाही त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही आमचे एक मिशन घेऊन मुंबईच्या दिशेने चाललो आहोत. रॅलीसाठी आम्ही पोलिसांची परवानगी घेतली होती. राज्य सरकारकडून आमची रॅली रोखण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात आहे, असे इम्तियाज यांनी सांगितले. तर रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांना अडचण येणार नाही, अशा पद्धतीने रॅलीला पुढे जाण्याची पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर रॅली मुंबईकडे रवाना झाली.
काकासाहेबांना अभिवादन
कायगाव (बातमीदार) : एमआयएमची रॅली गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथील गोदावरी नदी पुलावर आली. त्यावेळी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मारकाला खासदार इम्तियाज जलील यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यानंतर हुतात्मा काकासाहेब अमर रहे, मुस्लिम आरक्षण मिळालेच पाहिजे, वक्फ बोर्डच्या जमिनींवरील अतिक्रमणे, कब्जा काढावा आदी मागण्यांसंदर्भात मुस्लिम बांधवांनी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.