Crime Sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या दारासमोरच ‘मिनी कॅसिनो’

पोलिस आयुक्तालयापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावरील आणि सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या पथकाने छापा टाकला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - पोलिस आयुक्तालयापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावरील आणि सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या पथकाने छापा टाकला. सोमवारी सायंकाळी भोईवाडा भागात ही कारवाई करण्यात आली. यावेळी अड्डाचालक कुख्यात गुन्हेगार राम बोडखे आणि इतर ४० जणांसह लाखो रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.

शहरातील भोईवाडा भागात एका गादी तयार करणाऱ्या कारखान्यावर गेल्या काही महिन्यांपासून कुख्यात गुन्हेगार राम बोडखे हा कन्नड कल्चर सोशल क्लबच्या नावाखाली पत्त्याचा जुगार अड्डा चालवत होता. याची माहिती पोलिस उपायुक्त परिमंडळ १ चे नितीन बगाटे यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे, क्रांती चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील आणि पथकासह छापा टाकला.

यावेळी दरवाजे बंद करून आतमध्ये विविध टेबलवर मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याचे त्यांना दिसले. पोलिसांना पाहून अड्ड्यावर एकच खळबळ माजली. पोलिसांनी कारवाई करीत ४० जुगाऱ्यांना यावेळी ताब्यात घेतले. संशयितांना मुद्देमालासह क्रांती चौक पोलिस ठाण्यात नेण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

लाखोंचा मुद्देमाल, प्लास्टिक कॉइन जप्त

पोलिसांनी छापा टाकल्यावर रोख रक्कम तसेच प्लास्टिक कॉइनवर जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी ही रक्कम आणि कॉइन जप्त केले. तसेच क्लबच्या अन्य एका खोलीत आरोपी राम बोडखे याचे कार्यालय असून या ठिकाणी देखील ५०० रुपये आणि १०० रुपयांच्या नोटांची बंडले सापडली आहेत. ही रक्कम मोजण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अड्ड्यावर मोठ्या प्रमाणात सिगारेटच्या पाकिटांचे बॉक्स तसेच पत्त्याचे कॅट देखील सापडले आहेत. दरम्यान, या कारवाईमुळे शहरातील इतर जुगार चालवणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

राम बोडखेवर खून, बलात्काराचे गुन्हे

उपायुक्त नितीन बगाटे यांनी कारवाई केलेला जुगार अड्डा हा पोलिस आयुक्तालय आणि गुन्हे शाखेच्या कार्यालयापासून अवघ्या काही अंतरावर सुरू होता. अड्डाचालक राम बोडखे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी जिन्सी, सिडको पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, सामूहिक बलात्कार, खंडणी आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी अड्ड्यावर छापा मारल्यानंतर आरोपी बोडखे याने अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपायुक्त बगाटे यांनी त्याला सर्वांसमोर ‘समज’ दिली.

पोलिसांचे सुरू होते ‘भरण''

शहर पोलिस आयुक्तलयाजवळील या अड्ड्यावर प्रथमच कारवाई करण्यात आली आहे. याची माहिती मिळताच इतर काही जुगार अड्डाचालक तसेच त्यांच्या पंटरांनी गर्दी केली होती. यावेळी या अड्ड्याचे ‘भरण'' पोलिस आयुक्तालयातील काही ‘कलेक्टर’ नियमित करत असताना देखील कारवाई झाल्यामुळे हप्ते घेणाऱ्या अधिकाऱ्यांत खळबळ माजल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT